लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाला सुरुवात होताच वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. मंगळवारी दुपारी २.४५ सुमारास मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला. तासभर शहराच्या विविध भागात जोराचा पाऊस झाला. त्यानंतर अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत शहरात ३०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली तर सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यत २२.५ मि.मी. पाऊ स झाला. म्हणजेच दिवसभरात ५२.९ मि.मी. पाऊ स पडला.हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासात विदर्भातील अनेक भागात चांगला पाऊस होईल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच उत्तर ओरिसा व आसपासच्या भागात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. यामुळे मध्य भारतात पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झाले आहे.नागपूर शहरात सकाळपासून आकाश ढगाळ होते. दुपारी २ नंतर आकाशात काढे ढग दाटून आले. दुपारी २.४५ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पाऊ ण तास जोराचा पाऊ स झाला. यामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही रस्त्यांवर पाणी साचून होते.नागपूरसह विदर्भातही काही भागात चांगला पाऊ स झाला. ब्रह्मपुरी येथे २० मि.मी.गोंदिया १३.६ मि.मी.गडचिरोली ५.६ मि.मी.वर्धा ३.६, अमरावती व चंद्रपूर येथे १ तर यवतमाळ येथे १.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.पाणी घरात शिरलेपारडी चौक ते कळमना मार्केट चौक दरम्यानच्या उड्डाण पुलाचे काम काही वर्षापासून कासव गतीने सुरू आहे. कसेतरी पारडी चौक ते कळमना मार्केट दरम्यानच्या सिमेंट रोडच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. परंतु काही भागाचे काम अर्धवट आहे. जोराच्या पावसामुळे या भागात पाणी साचले. आजूबाजूच्या घरात पाणी शिरले. सिमेंट रोडच्या कामासोबतच पावसाळी नाल्याचे काम सुरू आहे. जुना भंडारा रोड रेल्वे क्रॉसिंगजवळ गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पारडी उड्डाण पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामामुळे वाहनधारक त्रस्त आहेत.गणेश मंडळाच्या अडचणी वाढल्यामंगळवारी जोराचा पाऊस झाल्याने गणेश मंडळांच्या अडचणी वाढल्या. मंडप व पेंडालमध्ये गळती सुरू झाली. तसेच पाणी साचल्याने कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. चिखल साचल्याने त्यावर रेती व मुरुम टाकण्यात आला. परंतु जोराच्या पावसामुळे रेती वाहून गेली. गणेशोत्सवात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचा विचार करता मंडळांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.
वरुणराजाची कृपा; मेघगर्जनेसह चांगला पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 11:18 PM
गणेशोत्सवाला सुरुवात होताच वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. मंगळवारी दुपारी २.४५ सुमारास मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला. तासभर शहराच्या विविध भागात जोराचा पाऊस झाला.
ठळक मुद्देनागपुरात ५२.९ मि.मी. पाऊ स : विदर्भात जोराच्या पावसाचा अंदाज