शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘अ’ श्रेणीचा दर्जा हवाच

By admin | Published: August 28, 2015 3:10 AM

पात्रतेचा सर्व अटी पूर्ण करूनही दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आलेला नाही.

संघटनांचा वाढता दबाव : शासनाने दखल घ्यावीनागपूर : पात्रतेचा सर्व अटी पूर्ण करूनही दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आलेला नाही. तेव्हा दीक्षाभूमीच्या सन्मानासाठी दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचे पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात लोकमतने पुढाकार घेतला आहे. लोकमतच्या या पुढाकारास आंबेडकरी जनतेसह विविध संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज विविध संघटनांतर्फे यासंदर्भात मागणी केली जात आहे. संवेदनशीलता दाखवावी मानवाला हजारो वर्षांच्या धार्मिक गुलामगिरीतून तथा शोषणातून मुक्त करून, त्याला समानतेचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या दीक्षाभूमीला अ श्रेणीचे पर्यटन स्थळ घोषित करा, अशी मराठा सेवा संघातर्फे आम्ही मागणी करीत आहोत. जगातून सर्वच ठिकाणावरून अनेक लोक दीक्षाभूमीवर येऊन समानता व मानवतेचा संदेश घेऊन जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीवरून सर्व जगाला धम्मचक्रक्रांतीचा प्रकाश दिला. जागतिक महत्त्व लक्षात घ्यावे दीक्षाभूमीचे महत्त्व हे देशापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते जागतिक बौद्धांचे केंद्र बनले आहे. दीक्षाभूमीचे हे जागतिक महत्त्व लक्षात घेण्याची गरज आहे. दीक्षाभूमीला कुठल्याही श्रेणीत बसवता येणार नाही, मात्र शासन दरबारी त्याची श्रेणी ठरवली जात असेल तर ती ‘अ’ श्रेणीचीच असायला हवी. तेव्हा यासंदर्भात शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा व ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा. नरेश वाहाणे, अध्यक्ष, रिपब्लिकन मुव्हमेंट ‘अ’ श्रेणीच हवी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पवित्र दीक्षाभूमीवर ऐतिहासिक धम्मक्रांती घडवली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त जगाला मानवतेची शिकवण देणारी जागतिक कीर्तीचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचाच दर्जा हवा. आजपर्यंतच्या सरकारने जे काम केले नाही ते सध्याच्या सरकारने केले, त्याचे स्वागत आहेच. परंतु दीक्षाभूमीचे एकूण महत्त्व लक्षात घेऊन राज्य सराकरने दीक्षाभूमीला अ श्रेणीचाच दर्जा द्यायला हवा. तेव्हा शासनाने यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा. प्रकाश रामटेके, केंद्रीय अध्यक्ष - दलित पँथर भारतातीलच नव्हे तर जगाच्या विविध प्रांतामधील दलित समाजाला मानवतेच्या पातळीवर आणण्याचे कार्य याच भूमीवर झाले. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचे पर्यटन स्थळ घोषित करावे. सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीला सुद्धा अ श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन त्याचा सुद्धा विकास सरकारने करावा. -विजयकुमार शिंदे, मराठा सेवा संघ