लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी ५ वाजता थांबणार. प्रचाराचा शेवटचा दिवस हा रविवार असल्याने प्रत्येक उमेदवाराने शक्तिप्रदर्शनाची तयारी करून ठेवली आहे. राजकीय पक्षांकडून संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अनेक ज्येष्ठ नेते रविवारी निवडणूक प्रचारात दिसून येतील.
महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झाल्यानंतर ही पहिली थेट निवडणूक आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीबाबत उत्सुकता वााढली आहे. कोविड-१९ च्या दरम्यान होत असलेल्या या निवडणुकीबाबत प्रशासनही सतर्क आहे. सरकारने जारी केलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोर पालन होत असल्याचा दावा केला जात आहे. यावेळी मतदार यादी नव्याने तयार झाली आहे. दोन लाख सहा हजार मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
बॉक्स
जिल्हा मतदान केंद्र मतदार
नागपूर १६४ १,०२,८०९
भंडारा ३१ १८,४३४
गोंदिया २१ १६,९३४.
वर्धा ३५ २३,०६८
चंद्रपूर ५० ३२,७६१
गडचिरोली २१ १२,४४८
-----------------------
एकूण ३२२ २,०६,४५४
असे आहेत उमेदवार
संदीप जोशी
अभिजित वंजारी
राजेंद्रकुमार चौधरी
इंजि. राहुल वाानखेडे
ॲड. सुनिता पााटील
अतुलकुमार खोब्रागडे
अमित मेश्राम
प्रशांत डेकाटे
नितीन रोंघे
नीतेश कराळे
डॉ. प्रकाश रामटेके
बबन ऊर्फ अजय तायवाडे
अधि. मोहम्मद शाकीर अ. गफ्फार
सीए राजेंद्र भुतडा
प्रा. डॉ. विनोद राऊत
ॲड. वीरेंद्रकुमार जायस्वाल
शरद जीवतोडे
प्रा. संगीता बढे
इंजि. संजय नासरे