लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामीण भागातील डाकसेवकांनी गेल्या १२ दिवसापासून सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. रामटेक येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृतीची पर्वा न करता सलाईन लावून सहभागी झालेले मनसरचे शाखा डाकपाल हरिशंकर ढोक यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. रखरखत्या उन्हातही देशभरात सुरू असलेल्या संपादरम्यान आतापर्यंत पाच डाक कर्मचाऱ्यांचे बळी गेले असून, यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. केंद्र शासन व डाक विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण डाक कर्मचारी ‘करो या मरो’ या जिद्दीला पेटलेले असून, हे आंदोलन आणखी भडकण्याचे चिन्हे दिसून येत आहेत.ग्रामीण डाकसेवक समस्या निवारण मंचअंतर्गत विविध मागण्यांसाठी देशभरात संप सुरू असून, यामध्ये २.५० लाखांच्यावर कर्मचारी सहभागी आहेत. गेल्या १२ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. नागपूर विभागातील रामटेक रिजनमधील कर्मचाऱ्यांचेही आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी हरिशंकर ढोक यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना सलाईन लावण्यात आली होती. मात्र सलाईन लावूनही ते आंदोलनात सहभागी झाले. यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली व नागपूरला आणताना त्यांचा मृत्यू झाला. हरिशंकर ढोक हे या आंदोलनातील पाचवे बळी ठरले आहेत. यापूर्वी काटोल भागातील आंदोलनात सहभागी नत्थूजी शिरपूरकर यांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता. याशिवाय १ जूनला सोलापूर डाक विभागातील डाकपाल डी.एल. बीरादार यांचा मोर्चादरम्यान चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला तर सांगली येथील लक्ष्मण सुहासे या कर्मचाऱ्याचाही असाच मृत्यू झाला. कर्नाटकातील टाऊनबाजार उपडाकघर येथील जीडीएस पॅकर नागेंद्र प्रसाद यांचा आंदोलनात मृत्यू झाला. आंदोलनातील काही कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. संघटनेचे सल्लागार सदस्य अॅड. डी.बी. वलथरे यांनी सांगितले की, आंदोलनात सहभागी कर्मचारी आता जिद्दीला पेटले असून शासनाने मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर हे आंदोलन आणखी पेटेल, अशा इशारा त्यांनी दिला.ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्थापन झालेल्या कमलेशचंद्र आयोगाच्या शिफारशी लागू करून कर्मचाऱ्यांचे वेतन व सुट्यासंबंधी धोरण ठरविण्यात यावे, ग्रामीण डाकसेवकांना डाक विभागात कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये नागपूर विभागातील ४,५०० कर्मचाऱ्यांसह राज्यातील ७० ते ८० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.
ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 8:58 PM
ग्रामीण भागातील डाकसेवकांनी गेल्या १२ दिवसापासून सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. रामटेक येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृतीची पर्वा न करता सलाईन लावून सहभागी झालेले मनसरचे शाखा डाकपाल हरिशंकर ढोक यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. रखरखत्या उन्हातही देशभरात सुरू असलेल्या संपादरम्यान आतापर्यंत पाच डाक कर्मचाऱ्यांचे बळी गेले असून, यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. केंद्र शासन व डाक विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण डाक कर्मचारी ‘करो या मरो’ या जिद्दीला पेटलेले असून, हे आंदोलन आणखी भडकण्याचे चिन्हे दिसून येत आहेत.
ठळक मुद्देमनसरचे डाकपाल ढोक यांचा मृत्यू : १२ दिवसात ५ कर्मचाऱ्यांचा बळी