लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तेरापंथाचे अकरावे आचार्यश्री महाश्रमण यांच्या अहिंसा यात्रेचे सोमवारी नागपुरात आगमन झाले. समाजबांधवांनी यावेळी आचार्यश्री यांचे स्वागत केले. सद्भावना, नैतिकता आणि प्रामाणिकपणाच्या संदेशाने जनमानसाला पवित्र करणाऱ्या या अहिंसा यात्रेचे नागपुरात आगमन झाले. अणुव्रत प्रवर्तक आचार्यश्री तुलसी यांचे नागपुरात पदार्पणाच्या जवळपास ५० वर्षांनंतर आचार्यश्री महाश्रमण यांचे पदार्पण जैन समाजासह अन्य समाजबांधवांमध्ये उत्साहाचे ठरले. नागपुरात टाळेबंदी आणि कोरोना संक्रमणामुळे स्वागतावेळी प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात येत आहे. नियोजित व्यवस्थेनुसार प्रवासात मर्यादित संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सभेचे अध्यक्ष सुनील छाजेड, स्वागत समिती अध्यक्ष अरुण भंडारी, तेयुप अध्यक्ष महेंद्र आंचलिया, महिला मंडळ अध्यक्ष भारती बाबेल, टीपीएफ अध्यक्ष अर्चना जैन यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, खा. कृपाल तुमाने, माजी खा. अजय संचेती, अतुल कोटेचा, सुभाष काेटेचा, दिलीप राय, राजन ढड्डा, राजेंद्र वैद्य, कोषाध्यक्ष पवन जैन, माध्यम प्रभारी प्रेमलता सेठिया उपस्थित होते.
............