सावनेर/कळमेश्वर/नरखेड/रामटेक/उमरेड/काटाेल/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील काेराेना संक्रमण व मृत्यूदराचा आलेख थाेडा उतरला असल्याचे रविवारी दिसून आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या काेराेना टेस्टमध्ये सामवनेर तालुक्यात १४७ रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, कळमेश्वर तालुक्यात ११५, नरखेडमध्ये १११, रामटेक तालुक्यात ७७, उमरेडमध्ये ६५, काटाेल तालुक्यात २७ तर हिंगण्यात २४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक १४७ रुग्ण सावनेर तालुक्यात आढळून आले असून, यात ६० रुग्ण सावनेर शहरातील तर ८७ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. कळमेश्वर तालुक्यात ११५ रुग्णांची भर पडली. यात शहरातील २२ तर ग्रामीण भागातील ९३ रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील ९३ रुग्णांमध्ये धापेवाडा येथील १८, तिष्टी (बु), तेलकामठी व आष्टी (कला) येथील प्रत्येकी ५, दाढेरा ४, कळंबी, मोहपा, आदासा, हरदोली, घोराड व मडासावंगी येथील प्रत्येकी ३, नांदीखेडा, बोरगाव (खुर्द), भडांगी, बोरगाव (बु), उपरवाही, कोहळी, सावळी (खु) व सावळी (बु) येथील प्रत्येकी २, सिंदी, झुनकी, खैरी (लखमा), गोवरी, निळगाव, तोंडाखैरी, सोनोली, लोहगड, म्हसेपठार, उबाळी, झिल्पी, तिडंगी, उबगी, लिंगा, खापरी, लोणारा, दहेगाव, केतापार, गळबर्डी, मांडवी, पानउबाळी व सवंद्री येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
नरखेड तालुक्यात १११ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात नरखेड शहरातील ६९ तर ग्रामीण भागातील ४२ रुग्ण आहेत. सावरगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये २३, जलालखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ३ तर मोवाड प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये १६ रुग्ण आढळून आले. तालुक्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २,५७० झाली असून, यात शहरातील ४३४ तर ग्रामीण भागातील २,१३६ रुग्ण आहेत.
रामटेक तालुक्यात ७७ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात शहरातील १९ तर ग्रामीण भागातील १४४ रुग्ण आहेत. तालुक्यात आजवर ५,१७३ रुग्ण आढळून आले असून, यातील २,८१८ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २,३५५ आहे, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी दिली. उमरेड तालुक्यात रविवारी ६५ रुग्ण आढळून आले. यातील ३५ रुग्ण उमरेड शहरातील असून, ३० रुग्ण तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत.