लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडिगो एअरलाईन्सने सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या नागपूर- हैदराबाद-नागपूर विमानाचे संचालन एक महिन्यासाठी बंद केले आहे. उड्डाण ७२ सिटांच्या लहान एटीआर विमानाने करण्यात येत होते. त्याऐवजी आता कंपनीतर्फे हैदराबाद विमानाचे संचालन सायंकाळी ६.४० वाजता करण्यात येत असून त्याकरिता एअरबस-३२० विमानाचा उपयोग करण्यात येत आहे. या विमानाची क्षमता १८० सिटची आहे.पूर्वीही एटीआर विमानाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. लोड कमी असल्याचे कुठलेही कारण नव्हते. त्यानंतरही एटीआर विमानाने संचालन करताना कंपनीने सायंकाळी मोठ्या विमानाने सेवा सुरू केली आहे. इंडिगोच्या एटीआर विमानामध्ये निरंतर तांत्रिक त्रुटींच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतरही प्रवाशांची संख्या वाढली होती. या व्यतिरिक्त नागपूर ते हैदराबाद मार्गावर ट्रू जेट एअरलाईन्सची उड्डाण सुरू होणार आहे. त्यामुळेच इंडिगोने नागपुरातून आधीच जास्त सिटच्या विमानाने सेवा सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
हैदाराबादसाठी आता मोठ्या विमानाचे उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:11 AM
इंडिगो एअरलाईन्सने सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या नागपूर- हैदराबाद-नागपूर विमानाचे संचालन एक महिन्यासाठी बंद केले आहे. उड्डाण ७२ सिटांच्या लहान एटीआर विमानाने करण्यात येत होते. त्याऐवजी आता कंपनीतर्फे हैदराबाद विमानाचे संचालन सायंकाळी ६.४० वाजता करण्यात येत असून त्याकरिता एअरबस-३२० विमानाचा उपयोग करण्यात येत आहे. या विमानाची क्षमता १८० सिटची आहे.
ठळक मुद्देसकाळच्या एटीआर विमानाचे उड्डाण बंद