लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि नागरिक सुविधांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान विकास निधीमधून जिल्ह्याला १३५ कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी ८५ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात १० एकरावर ‘ग्रीन बेल्ट’ तयार करण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत विकास कामांसाठी उपलब्ध झालेला निधी आढावा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा खनिज कर्म अधिकारी श्रीराम कडू, प्रतिष्ठानचे सदस्य कौस्तुभ चॅटर्जी उपस्थित होते.जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्राप्त झालेला निधी सामूहिक व सामाजिक विकास, पायाभूत सुविधा, आरोग्य, पिण्याचे पाणी, जलसंसाधनाचा विकास तसेच पर्यावरण व स्वच्छतेसाठी प्राधान्याने करण्यात येत असून विभाग प्रमुखांनी प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी केल्या.उमरेड व रामटेक या तालुक्यातील भौतिक सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी १० कोटी रुपये डागा रुग्णालय इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांनी साधन सामुग्री व आवश्यक सुविधांसाठी निधी तसेच जिल्ह्यातील सर्व नळ पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यासाठी निधीची उपलब्धता समाज कल्याण विभागातर्फे ११२५ लाभार्थ्यांना ट्रायसिकलचे वाटप, कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत आर्थिक प्रगतीसाठी विशेष उपक्रम राबविणे, पर्यावरण संवर्धनाअंतर्गत जागृती निर्माण करणे तालुकानिहाय विशेष निधी यावेळी मंजूर करण्यात आला.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी माहिती दिली. जिल्हा खनिज कर्म अधिकारी श्रीराम कडू यांनी आभार मानले.सिंचन पुर्नस्थापनेसाठी तालुक्याला १० कोटीसिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी किरकोळ दुरुस्ती, शेतचाऱ्या पूर्ण करणे, गेट लावणे आदी कामांसाठी राळेगण सिद्धीच्या धर्तीवर खनिज प्रतिष्ठान निधीमधून दोन वर्षांचा विशेष कार्यक्रम तयार करण्यात येऊन १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी तालुकानिहाय प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक तालुक्यात ‘ग्रीन बेल्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 9:25 PM
पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि नागरिक सुविधांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान विकास निधीमधून जिल्ह्याला १३५ कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी ८५ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात १० एकरावर ‘ग्रीन बेल्ट’ तयार करण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली.
ठळक मुद्देप्रत्येक तालुक्याला पाच कोटीचा निधी : पालकमंत्र्यांची घोषणा