मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारंपरिक शेती आता शेतकºयांना परवडण्यासारखी राहिली नाही, काहीतरी नावीन्यपूर्ण करावे, असे वारंवार शेतीतज्ज्ञांकडून, शासनाकडूनसुद्धा सांगण्यात येते. ही आवाहने स्वीकारण्यास मुळात शेतकरीच धजावत नाही. पण एखादा पाठीराखा मिळाला तर शेतकरीही आपले कसब दाखवायला तयार असतात. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली येथील शेतकºयांना एक मार्गदर्शक, पाठीराखा भेटला. एक दोन नव्हेत तर ४५ शेतकºयांनी त्याने दाखविलेल्या मार्गावर पाऊल ठेवले. यातून सामूहिक शेती फुलली, त्याचे फळ आता शेतकºयांनाच मिळत आहे.शेतकºयांचे हे मार्गदर्शक कोण तर निवृत्त झालेले विमा कंपनीचे अधिकारी डॉ. उल्हास निमकर, निवृत्त अतिरिक्त आयुक्त डॉ. जगदीश कुरळकर, मनपाचे निवृत्त कर अधिकारी शिवनाथ बन्सोड होत. हे तिघेही अरोली या गावाचे. निवृत्तीनंतर व्यवस्थित सेटल झालेले, परंतु त्यांची नाळ ही गावातील शेतीशी आणि गावकºयांशी आजही जुळलेली आहे. हीच जाणीव ठेवत आणि गावाच्या विकासाचे ध्येय बाळगत हे तिघेही मित्र एकत्र आले. शेती, शेतकºयांची परिस्थिती आणि गावाचा विकास यावर अभ्यास करून, शेतकºयांना शेती कशी किफायतशीर ठरेल, याचे प्रयत्न सुरू झाले. शेतकरी तेव्हाच प्रगती करू शकतो जेव्हा अडते, दलाल हे उत्पादक ते ग्राहकांदरम्यान राहणार नाही. याच संकल्पनेवर त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जनावरांसाठी प्रोटीनयुक्त चारा निर्मिती करण्याचे ठरविले. त्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, मार्केटचे सर्वेक्षण, गावकºयांची मानसिकता बदलविण्यासाठी संबोधन, गावकºयांचा फिल्ड सर्वे, शेतीचे व्यवस्थापन आदी सर्व गोष्टी जुळवून आणल्या. त्यासाठी शिबिर घेतले, गणेशोत्सव मंडळ स्थापन केले. स्वयंसेवी संस्था उघडली. यातून एक, दोन नव्हे तर ४५ शेतकरी पुढे आले.आपल्या शेतीतील कुणी एक एकर, कुणी दीड एकर अशी शेती या प्रयोगासाठी उपलब्ध करून दिली. जनावरांसाठी पोषक असलेले आफ्रिकेतील हायब्रिड नेफिअर डीएचएन-१० या गवताच्या ५.५ लाख रुपयांच्या बेण्या भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान येथून मागविण्यात आल्या. सॉईल टेस्टिंग लॅब तयार करण्यात आली. जमिनीची मशागत करून, या बेण्या लावण्यात आल्या. गवत मोठे झाले, शासनाकडून सबसिडीवर गावकºयांना चॉपर मशीन उपलब्ध करून दिल्या. डॉ. निमकर यांनी स्वत: गाई,म्हशी पाळणाºयांचा एक समूह तयार केला.दसºयापासून खºया अर्थाने व्यवसाय सुरू झाला. गाई, म्हशी पाळणाºयांना ताजा चारा केवळ सहा रुपये किलोने शेतकरी घरपोच उपलब्ध करून देतात. गेल्या दीड ते दोन महिन्यातच पाच ते सहा टन चारा दररोज गुराख्यांना पुरविला जातो. शेतकºयांना त्याचे रोख पैसेही मिळतात. या चाºयाचे वर्षाला प्रति एकर १०० टन उत्पादन होते. चाºयाच्या शेतीला कीड लागत नाही. त्यामुळे कुठलीही फवारणी करावी लागत नाही. मशागतीचासुद्धा खर्च कमी आहे. त्यामुळे प्रति एकरी एक लाख रुपये शेतकºयांना मिळवून देणारे हे पीक आहे. या चाºयाचे गाई पाळणाºयांनाही चांगले निकाल मिळत आहे. ‘सरकी आणि ढेप’ च्या तुलनेत चाºयाची किंमतही कमी आहे. त्यामुळे या चाºयाला गुराख्यांकडून प्रतिसाद मिळतो आहे.या उपक्रमामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत, समूह शेतीच्या माध्यमातून अरोलीच्या शेतकºयांना आर्थिक बळ मिळत आहे.माझ्या गावचा शेतकरी सधन व्हावागाव आणि शेतीशी नाळ जुळली असल्यामुळे निवृत्तीनंतर आपले अनुभव कामात यावे आणि गावाची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने आम्ही संकल्प केला आहे. एक रुपयाही शेतकºयांच्या व्यवसायातला आम्हाला नको आहे. फक्त आमच्या गावचा शेतकरी सधन व्हावा, हीच अपेक्षा आहे.- डॉ. उल्हास निमकर, निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स
‘सहकारा’च्या गवताने विकासाची हिरवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:44 AM
पारंपरिक शेती आता शेतकºयांना परवडण्यासारखी राहिली नाही, काहीतरी नावीन्यपूर्ण करावे, असे वारंवार शेतीतज्ज्ञांकडून, शासनाकडूनसुद्धा सांगण्यात येते.
ठळक मुद्देअरोली होतेय समृद्ध : जिल्ह्यात चारा उत्पादनाचा पहिला प्रयोग