शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

सूर्याच्या नाही, ‘एलईडी’च्या झगमगाटात पिकेल शेती!

By जितेंद्र ढवळे | Published: September 04, 2023 3:37 PM

ग्रीन हाउस आशेचा किरण : विद्यापीठ कॅम्पस अन् समुद्रपूरमध्ये होतोय प्रयोग

जितेंद्र ढवळे 

नागपूर : सूर्यदेवाचा अभ्यास करायला भारताचे आदित्य एल-१ यान निघाले आहे! मात्र सूर्याचे अवंलबित्व कमी करून एलईडी लाइटच्या बळावर शेती करता येईल का? यातून दर्जेदार उत्पादन घेता येईल का, यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आणि समुद्रपूर येथील विद्या विकास आर्ट ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये संशोधन सुरू आहे. 

‘एलईडी बेस्ड ग्रीन हाउस फॉर प्लांट कल्टिव्हेशन’ असे या संकल्पनेचे नाव आहे. एलईडी बेस ग्रीन हाउस ही संकल्पना जगासाठी नवी नाही! मात्र विदर्भात याचा वापर व्हावा. दुष्काळ आणि नापिकीच्या झळा सोसणारा येथील शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून अत्यंत कमी खर्चात एलईडी बेस्ड ग्रीन हाउस तयार करून शेती करता येईल का, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय ढोबळे आणि समुद्रपूरच्या विद्या विकास आर्ट ॲण्ड सायन्स कॉलेजच्या बॉटनी विभागाच्या प्रमुख डॉ. नयना शिरभाते गेल्या काही दिवसांपासून यावर संशोधन करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आता यशही आले आहे. 

ग्रीन हाउस म्हणजे काय?

- ग्रीन हाउस शेतीत आपण हंगामी पिकांसोबत बिगरहंगामी पिके घेऊ शकतो. हे वर्षभर पिकाची वाढ आणि फळांचे उत्पादन समृद्ध करण्यास मदत करते.- हे पिकांचे संरक्षण करण्यास आणि त्यांना कीड तसेच रोगांपासून मुक्त ठेवण्यास आणि वाढ कायम ठेवण्यास मदत करते. विशेष म्हणजे या शेतीसाठी पाणी कमी लागते.

यात एलईडीचा वापर कसा होणार?

- एलईडी ग्रोथ लाइट्स रोपांना ग्रीन हाउसमध्ये सूर्यप्रकाशाचे अनुकरण प्रदान करतात. हे दिवे विशिष्ट प्रकाश स्पेक्ट्रम (विशेषत: लाल आणि निळे) उत्सर्जित करतात जे वनस्पतींच्या वाढीवर परिणाम करतात. - एलईडी हा ग्रीन हाउससाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण तो वनस्पतींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापक कस्टमायझेशन ऑफर करतो. कमी उष्णता उत्सर्जित करतो. 

कोणता रंग काय करतो?

ब्लू एलईडी (निळा रंग): ब्लू एलईडी हा झाडांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतो. रेड एलईडी (लाल रंग) : रेड एलईडीमुळे रोपांची वाढ होते. फार रेड एलईडी : फार रेड एलईडीमुळे झाडांना फळ धारणा होण्यास मदत होते.

एलईडी बेस्ड ग्रीन हाउसमध्ये औषधी वनस्पतीचे (मेडिकल प्लांट) संगोपन सहज शक्य आहे. इतकेच काय ज्या पिकांचे किंवा फळांचे उत्पादन आपल्याकडे होत नाही ते यातून साध्य करता येईल. कमी खर्चात हे युनिट तयार करता येते. यात ड्रिप वॉटर सिस्टीमचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाचा व्यापक स्वरूपात वापर झाल्यास शेतकऱ्यांना सोनेरी दिवस येतील. आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. डिसेंबरमध्ये हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यात येईल. 

- डॉ. संजय ढोबळे, शास्त्रज्ञ

टॅग्स :scienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञानAgriculture Sectorशेती क्षेत्रRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ