लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बस प्रदूषणमुक्त वा वातानुकूलित असल्यातरी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रतिसाद वाढावा यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवासी भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला. ६ एप्रिलपासून नवीन दर लागू करण्यात आले. परंतु यानंतरही ग्रीन बसेस रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे.सध्या शहरातील विविध मार्गावर २५ ग्रीन बसेस धावतात. या बसेस वातानुकूलित असूनही प्रवाशांचा या बसेसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. फेब्रुवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ग्रीन बसच्या ३३,२५१ फेऱ्या झाल्या. या बसेस ६,२१,०५७ किलोमीटर धावल्या. यातून ३३,००३९ प्रवाशांनी प्रवास केला. प्रत्येक बसमधून सरासरी ९.९३ प्रवाशांनी प्रवास केला, म्हणजे १० पेक्षाही कमी प्रवासी होते. ही संख्या फारच कमी असल्याने ग्रीन बसचा तोटा वाढत आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी प्रवासी भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्यात आली. मात्र दहा दिवसात प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर हा प्रस्ताव सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार होता. त्यानंतर हेच दर नेहमीसाठी कायम ठेवण्याचा समितीचा विचार आहे. दरकपातीनतंरही प्रवाशांची संख्या न वाढल्याने तोटा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उन्हाळ्याचे दिवस विचारात घेता वातानुकूलित बसला प्रतिसाद मिळेल. अशी अपेक्षा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र बहुसंख्य ग्रीन बसेस रेडबसेसच्या मार्गावर धावतात. त्यांचे वेळापत्रकही मिळतेजुळते आहे. तिकीट कमी असल्याने प्रवाशांची पसंती रेड बसला आहे.तोटा घटण्याची शक्यता कमीचवर्षभरात ग्रीन बस ६,२१,०५७ किलोमीटर धावली. प्रति किलोमीटर ८५ रुपयेप्रमाणे आॅपरेटला देण्यात आले. याचा विचार करता महापालिकेने ग्रीन बसवर ५ कोटी २७ लाख ८९ हजार ८४५ रु पये खर्च केला. प्र्रवासी उत्पन्नातून मात्र ८८ लाख १७ हजार ९ रुपयांचा महसूल जमा झाला. म्हणजेच वर्षभरात ४ कोटी ३९ लाख ७२ हजार ८३६ रुपयांचा तोटा झाला. भाडे कपातीनंतर हा तोटा कमी होण्याची शक्यता कमीच आहे.
नागपुरात भाडेकपात करूनही ग्रीनबस रिकामीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 8:51 PM
इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बस प्रदूषणमुक्त वा वातानुकूलित असल्यातरी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रतिसाद वाढावा यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवासी भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला. ६ एप्रिलपासून नवीन दर लागू करण्यात आले. परंतु यानंतरही ग्रीन बसेस रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देप्रवाशांचा प्रतिसाद नाही : प्रवाशांची पसंती रेडबसलाच