शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

हिरवळ ३३ टक्के तर वनक्षेत्र १८ चौ. किमी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:06 AM

नागपूर : मेट्रो सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीवर पर्यावरणाचे संकट घोंगावू लागले आहे. कधी काळी हरित शहर म्हणून ओळखले जाणारे ...

नागपूर : मेट्रो सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीवर पर्यावरणाचे संकट घोंगावू लागले आहे. कधी काळी हरित शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर आता हळूहळू आपला सन्मान गमावेल अशी भीती व्यक्त होत आहे. कारण स्थिती तसेच चित्र दाखवत आहे. नागपूर शहराचे ग्रीन कव्हर तब्बल ३३ टक्क्यांनी घटले आहे. एवढेच नाही तर जिल्ह्याच्या वनक्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.६२ चौरस किलोमीटरची घट झाली आहे. अशात वाढते प्रदूषण आणि तापमान माणसांसाठी तापदायक ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

२००० सालापासून नागपूरच्या केंद्रबिंदूपासून ते ३० किमीच्या परिघात असलेल्या वनक्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. १९९९ साली या परिघात ११६ चौ. किमी वनक्षेत्र होते. २०१३ पर्यंत ते ९१ चौ. किमीवर आले तर २०१८-१९ पर्यंत ते ७४ चौ. किमीपर्यंत खाली घसरले. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणानुसार २०१७ नंतर २०१९-२० मध्ये जिल्ह्याच्या वनक्षेत्रात १८.६२ चौ. किमीची घट झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. आता केवळ वनक्षेत्र घटण्याची चिंता राहिली नाही तर प्रदूषणात झालेली भरमसाट वाढ आणि तापमानात होणारी वाढ हेही चिंतेचे कारण ठरत आहे.

विकसित शहर म्हणून भरमसाट चालणाऱ्या बांधकाम कार्याने धूलिकणांच्या प्रदूषणात कित्येक पटीने वाढ झाली आहे. पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरीच्या अहवालानुसार धूलिकणांच्या प्रदूषणात ५६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. अशात हिरवळ कमी झाल्याने तापमानातही २ ते ३ अंशांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हवेची गुणवत्ता ६०-७० च्या आसपास असणे अपेक्षित असताना मुंबई, पुणे, नागपूरसह इतर प्रमुख शहरांची पातळी गेल्या काही वर्षांत १५० च्या पार गेली. शहरातील तलावांची स्थितीसुद्धा दयनीय झाली आहे. शहरात कधीतरी असलेल्या १६ तलावांपैकी केवळ पाच तलाव सुस्थितीत आहेत व त्यातील काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप काही गमावत चालल्याची चिंता करावी लागणार आहे.

२०२० पासून कोरोना महामारीच्या प्रकोपाचा काळ मानवासाठी भयावह आठवणी देणारा ठरला असला तरी पर्यावरणाबाबत दिलासा देणारा ठरला. या महामारीने जगाला थांबविले आणि प्रदूषणालाही खाली आणले. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर जे शक्य झाले नाही ते कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शक्य झाले. प्रदूषणाचा स्तर अनेक वर्षांच्या नीचांकीवर आला होता. एक प्रकारे पृथ्वीचा व पर्यावरणाचा जीर्णोद्धारच होण्याच्या मार्गावर होता. मात्र पुन्हा सर्व पूर्ववत होत असताना प्रदूषणाची स्थितीही जैसे थे होत आहे. त्यामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी लॉकडाऊनसारख्या पर्यायावर विचार करावा लागेल. वातावरण फाउंडेशनचे प्रमुख भगवान केसभट यांच्या मते राज्यातील १८ शहरांसाठी ‘क्लीन एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ची योग्य अंमलबजावणी गरजेची आहे.