लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरात शिवसेनेतर्फे ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यादम्यान ८३४ युनिट रक्तदान झाले.
शहर शिवसेनेतर्फे विधानसभानिहाय रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी, संघटक मंगेश काशीकर, विशाल बरबटे, मुन्ना तिवारी, हितेश यादव, नितीन नायक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पूर्व नागपुरात गुड्डू रहांगडाले, श्रीकांत कैकाड़े, अक्षय मेश्राम, धीरज फंदी, हरीश रामटेके, अजय दलाल, दक्षिण नागपुरात शहर प्रमुख दीपक कापसे, विशाल कोर्के, मुकेश रेवतकर, मध्य नागपुरात किशोर पराते, नाना झोडे, पुरुषोत्तम कांद्रीकर, उत्तर नागपुरात ओम यादव, आशीष हडगे, अब्बास अली, महेश ठाकूर, पश्चिममध्ये विकास अंभोरे, राम कुकडे एवं दक्षिण पश्चिममध्ये दीपक पाठक, प्रवीण शर्मा, सुशीला यांच्या संयोजनात शिबिर घेण्यात आले.
बॉक्स
सोमवारी क्वार्टरमध्ये मिठाई वाटप
नागोबा मंदिरात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली. नगरसेवक सतीश होले, माजी सह संपर्क प्रमुख चंद्रहास राऊत, पूर्व शहर प्रमुख सूरज गोजे, चंदू दंदे, डॉ. जॉन, डॉ. संजय लहाने, राजेश कनौजिया, प्रवीण अंधारे, विशाल मानवटकर, धीरज लारोकर, राजू रुईकर, सुखदेव ढोके, राजेश गुजर, राजेश लारोकर, भरत चौधरी, आनंद नेउलगावकर, प्रशांत चावके आदी उपस्थित होते.
बॉक्स
महालमध्ये कोविड योद्धांना प्रशस्तीपत्र
शिवसेनेच्या महाल शाखेत कोविड योद्धांना प्रशस्तीपत्र प्रदान करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. विक्रम राठोड, राजे जयसिंह भोसले, सुरेखा खोब्रागडे, कार्तिक मार्कंडेय, शंतनू शिर्के, सोनू गडेकर, अभिजीत दारलिंगे, पंकज कुंभलकर, सोनू शुक्ला, वैभव बैतुले, आशिष खडसे, मामा हर्षल आदी उपस्थित होते.
बॉक्स
पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर,
यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त युवा सेना व एमपीएससी व पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. दक्षिण नागपुरात रक्तदान शिबिर व गरजुंना ई-रिक्षाचे वाटप करण्यात आले. यासह विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे, बंडू तागडे, ओमकार पारवे, विवेक पारकर, शशिकांत ठाकरे, कुलदीप उपाध्याय, दीपक शेंदरे, शशिकांत ठाकरे, तुषार कोल्हे, राजू हरडे.
------------------