नागपूर : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभागाद्वारे नागपूर नगरीचे निर्माते गोंड राजे बक्त बुलंद शहा यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनासमोरील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर मायाताई इवनाते, गोंड राजे वीरेंद्र शाह, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, विदर्भ अध्यक्ष सूर्यकांत उईके, अ.भा. आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम उपस्थित होते. यावेळी शेराम म्हणाले की, गोंड राजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा, त्यांच्या स्मृती जपण्यासाठी नागपूर मुख्य रेल्वे स्टेशन व सीताबर्डी मेट्रो रेल्वे स्टेशनला गोंड राजांचे नाव द्यावे. संचालन यश मसराम यांनी केले. आभार विजय परतेकी यांनी मानले. प्रसंगी विनोद मसराम, अरविंद गेडाम, प्रशांत मडावी, रवींद्र पेंदाम, सुरेंद्र नैताम, मोनु धुर्वे, अनिकेत माकोडे, राहुल मडावी, जतिन शेराम, सौरभ मसराम, पियूष गेडाम आदी उपस्थित होते.