नागपूर : भारत देशात मुलींसाठी पहिली शाळा काढणारे, स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले याना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी विविध आयोजनांच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या कार्यप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ
१९ व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी नरेंद्र धनविजय, डॉ.सोहन चवरे, सुभाष गायकवाड, बबनराव ढाबरे, जालिंदर गजभारे, राजकुमार रंगारी, प्रेमदास बागडे, अजय वानखेडे, देवीदास.हेलोडे, अविनाश इंगळे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन एकता मंच
महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. सीताबर्डी येथील कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगरसेविका वंदना भगत, नरेंद्र चव्हाण, मारोती ठाकरे, चेतन सवाई, दिव्या चव्हाण आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कॉटन मार्केट स्थित पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मनोज जाणोरकर, रेखाताई कृपाले, शहर उपाध्यक्ष सचिन मोहोड आणि नागपूर ग्रामीण अध्यक्ष योगेश ठाकरे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी (खोरीपा)
रिपब्लिकन पार्टी खोरिपातर्फे कॉटन मार्केट स्थित महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्यासह कवी सूर्यभान शेंडे, प्रा. किशोर शेंडे, विशाल सरोजकर आदी उपस्थित होते.