शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

By admin | Published: October 03, 2015 2:52 AM

जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती शहरात विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी साजरी केली.

नागपूर : जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती शहरात विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी साजरी केली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शाळांमध्ये महात्मा गांधीच्या जीवनावर मार्गदर्शन कार्यक्रम साजरे झाले.

महात्मा गांधी यांना राजभवनात अभिवादन राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त अप्पासाहेब धुळाज प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हधिकारी गिरीश जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते. श्री गजानन महाराज मारोती देवस्थान समिती शांतीनगर, श्री गजानन महाराज मारोती देवस्थान समितीने गांधी जयंती व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. नागरिकांच्या सहकार्यातून जैन मंदिरासमोरील परिसर स्वच्छ केला. श्रमदानात स्थानिक महिला, पुरुष व मुलेही सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे सुनील गाढवे, प्रशांत जिभकाटे, संजय नवथरे, श्रीपती पटेल, राजू गाडगे, दिपक पटले, परमानंद बोपचे आदी सहभागी झाले होते. अभियानास झोन सभापती रामदास गुडधे, नगरसेविका कोवे यांनी नागरिकांना प्रोत्साहित केले. सम्यक ज्येष्ठ नागरिक मंच गांधी जयंतीचे औचित्य साधून सम्यक ज्येष्ठ नागरिक मंचच्या पदाधिकारी व सदस्यांनी श्रमदान करून कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. नगरसेवक संदीप सहारे व महापालिकेच्या आरोग्यविभागाने या कार्यात सहकार्य केले. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविले. अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, अनिल सोले, नगरसेविका सारिका नांदुरकर, रिता मुळे, माजी नगरसेवक कैलास चुटे उपस्थित होते. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांच्याहस्ते गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. महावितरणमहावितरणच्या प्रकाश भवन येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी अधीक्षक अभियंता नागपूर शहर मंडळ सुरेश मडावी, अधीक्षक अभियंता आर. एम. बुंदिले, सहा. महाव्यवस्थापक सत्यजित राजेशिर्के, कार्यकारी अभियंता प्रशांत सराफ, सुनील साळवे, पी.एस. तगलपल्लीवार, अनिल बाकोडे, श्वेता जानोरकर व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.