नागपूर : राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आले. सामाजिक संघटना व शाळा-महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त रक्तदान शिबिर, गुणवंत व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
रामकृष्ण वाघ महाविद्यालय काेराडी
काेराडी : येथील रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती कॉन्व्हेंट ॲण्ड हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेच्या संचालिका प्राचार्य लता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे स्थायी सदस्य प्रा. वसंत हिवरकर, प्राचार्य पंकज झगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पूनम वाघ यांनी केले. आभार प्रा. लीला वाघ यांनी मानले.
...
नगर परिषद खापा
खापा : स्थानिक नगर परिषद येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला कर्मचाऱ्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी सागर पहाडे, अनिल कोंडे, धनंजय ढोले, संजय कुंभारे, प्रमोद लखडकर, मोनेश रेवतकर, चुन्नीलाल बोरकर, सुभद्रा फुलझेले, इंदिरा सोनकुसले, नलवंती उमरेडकर, आदी उपस्थित हाेते.
...
माताेश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड
नरखेड : येथील माताेश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. प्रवीण काेहळे हाेते. यावेळी प्रा. एस. बी. चव्हाण, प्रा. डाॅ. कडवे, प्रा. डाॅ. मनाेज पवार, प्रा. डाॅ. नीलेश हरणे, प्रा. ढाेके, प्रा. रमेश शेंडे, प्रा. राधेश्याम ठाकरे, रासेयाे कार्यक्रम अधिकारी डाॅ. प्रशांत देशमुख, आदी उपस्थित हाेते. राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर मान्यवरांनी विचार मांडले. प्राचार्य डाॅ. प्रवीण काेहळे यांनी अध्यक्षीय भाषणात आजच्या युवकांच्या शैक्षणिक जीवनावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक प्रा. डाॅ. मनाेज पवार यांनी केले. संचालन प्रा. डाॅ. प्रशांत देशमुख यांनी केले. प्रा. राधेश्याम ठाकरे यांनी आभार मानले.