पारशिवनी : शहरात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन व मालार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
पारशिवनी नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयाेजित केलेल्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, मुख्याधिकारी अर्चना वंजारी, नगरसेवक दीपक शिवरकर, विजय भुते, राहुल ढगे, टीकाराम परतेकी, रोशन पिंपरामुळे, रामकिशन सदगत यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. प्रतिभा कुंभलकर व अर्चना वंजारी यांनी शिवरायांच्या जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. शहरातील जुन्या बसस्थानक चौकात कार्यक्रम आयाेजित केला हाेता. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, तहसीलदार वरुणकुमार सहारे, पंचायत समितीचे उपसभापती चेतन देशमुख, पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे, नगरसेविका अनिता भड, सिंधू चव्हाण, सेवक भिवगडे, गौरव पनवेलकर, अमोल कनोजे, सनी शिंदे, दिनेश राऊत, गौरव कामडे, विश्वास भिवगडे, अंकित वाळके यांच्यासह पोलीस मित्र व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यक्रमाला पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
खडतकर सभागृहातील कार्यक्रमाला आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेचे सदस्य अर्चना भोयर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद डोणेकर, चंद्रपाल चौकसे, कमलाकर मेंघर, श्रीधर झाडे, डॉ. इरफान अहमद, गोपाल कडू , विजय भुते, रूपेश खंडारे, खुशाल कापसे, अरविंद दुणेदार, विकास ढोबळे, चेतक इटनकर, इम्रान बाघाडे यांच्यासह नगरपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात खंडविकास अधिकारी अशोक खाडे, उपसभापती चेतन देशमुख यांच्यासह ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते.