जलालखेडा : स्वामी विवेकानंद यांच्या ११९ व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (दि. ४) जलालखेडा (ता. नरखेड) येथील एस.आर.के. इंडो पब्लिक स्कूलमध्ये ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले हाेते.
यात शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आपापल्या भाषणांमधून स्वामीजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य शुभांगी अर्डक, पर्यवेक्षिका प्रियंका देशमुख, रक्षा शुक्ला, सरिता तिवारी, नलिनी मुदगल, अश्विनी रेवतकर आदी शिक्षकांसह अनन्या कडू, दिशांत रॉय, गुंजन ठाकरे, निष्ठा काकडे, समीक्षा राठोड, तनुज तळहांडे, अनुश्री कळंबे, लावण्य रुद्रकार या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर तपशीलवार मार्गदर्शन केले.
060721\screenshot_2021-07-06-08-44-35-270_com.whatsapp.jpg
फोटो ओळी :- ऑनलाईन पद्धतीने स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगताना वर्ग ७ वि ची विद्यार्थिनी अनन्या कडू.