डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे संयोजिका सुलेखा कुंभारे यांच्या नेतृत्वात संविधान चौक व दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेविका वंदना भगत, भीमराव फुसे, अजय कदम, अशोक नगरारे, थूल गुरुजी, भरत जवादे, नारायण नितनवरे, दीपंकर गणवीर, नियाज कुरेशी, मनोहर गणवीर, विष्णू ठवरे, नरेंद्र चव्हाण, नंदा गोडघाटे, रत्नमाला मेश्राम, जया पानतावणे, महानंदा पाटील, कांता ढेपे, लीला आंबुलकर, सुनंदा रामटेके, शकुंतला पाटील, अहिल्या रंगारी, गजानन भावे, सुनील वानखेडे, सचिन नेवारे, शरद राहाटे, मनीष मेंढे, सागर भावे, विनय बांबोर्डे, शुभम रंगारी, रेखा भावे, रजनी लिंगायत, साधना हरडे, विशाखा गेडाम आदी उपस्थित होते.
------------------
पालकमंत्री नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन ()
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर विनम्र अभिवादन केले. बौद्ध स्तुपाच्या आतील तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण व अभिवादन केले. यावेळी सामूहिकरीत्या बौद्धवंदना घेण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी.,पोलीस उपायुक्त नरुल हसन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंदत सुरई ससाई, सचिव सुधीर फुलझेले, विश्वस्त विलास गजघाटे, सदस्य एन.आर. सुटे, आनंद फुलझेले, आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या बी.एन. मेहरे व विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
-------------------------
रिपब्लिकन सेना
रिपब्लिकन सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संविधान चौक नागपूर येथे अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे, भूषण भस्मे, धर्मपाल वंजारी, मनीष रंगारी, सुरेंद्र मस्के, राजकुमार तांडेकर, शरद दंडाळे, नरेंद्र तिरपुडे, सुरेश मानवटकर, गणेश सिंगाडे, राजू मेश्राम, सुरेश खोब्रागडे, रंजना डबरासे, पूजा भस्मे, रमाबाई वंजारी, माला मस्के सायली रंगारी, गणेश शिंगाडे, भीमराव नितनवरे, राष्ट्रपाल कोथरे, पद्माकर कापसे, अमित नितनवरे, अमन फुलझेले, आयुष नगरारे, आरव कापसे, बबलू हाडके, विनय कोठारे, बापू खांडेकर, सिद्धार्थ भस्मे यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र ()
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे सुलेखा कुंभारे याांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भिक्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना घेण्यात आली. यासोबतच ओगावा सोसायटी, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, जय भारत सोसायटी, बिडी उत्पादक सहकारी संस्था आदींतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी अजय कदम, सावला सिंगाडे, सुभाष सोमकुवर आदी उपस्थित होते.