कमल शर्मा
कोल ‘वॉशरी’चा गोलमाल भाग ३
नागपूर : कोल वॉशरीजचा खेळ अगदी विचित्र आहे. या खेळात एकीकडे एका मोठ्या नेत्याच्या खास व्यक्तीचे पुनर्वसन झाले, तर दुसरीकडे एका माजी मंत्र्याच्या निकटवर्तीयाने किराणा दुकान ते कोल वॉशरीजपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.
किराणा दुकान चालवणारे ते गृहस्थ म्हणजे कोल वॉशरीजचे २० टक्के काम करणाऱ्या रुक्माई या कंपनीचे संचालक संजय हरदवानी होत. महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी ते शहरात किराणा दुकान चालवित होते. यानंतर त्यांनी कमाल चौकात बालाजी बॅग नावाचे दुकान उघडले. येथून त्यांची मंत्रिमहोदयांशी जवळीक निर्माण झाली. त्यांची बरीचशी कामेही तो हाताळू लागला. त्यानंतर त्यांनी कोळशाच्या क्षेत्रात उडी घेतली. त्यांचा फायदा व्हावा यासाठी एमएसएमसीने ८० आणि २० टक्के कामासाठी दोन निविदा काढल्या. काही दिवसांनीच हरदवानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कंपनी रुक्माईला काम मिळाले. काळ बदलला. मंत्रिमहोदयांची खुर्ची गेली, पण संजय हरदवानी हे नव्या सरकारमध्येही आपल्या जागी मात्र कायम आहेत.
एमएसएमसीलाही फायदा
महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळालाही (एमएसएमसी) कोल वॉशरीचे फायदे मिळत आहेत. कोल वॉशरीच्या माध्यमातून केलेल्या धुलाईचे पेमेंट महाजेनको एमएसएमसी देते.
ते ५ रुपये प्रतिटन सेवा शुल्क कापून कोल वॉशरीला पेमेंट करते. यापूर्वी हे काम महाजेनकोच्या माध्यमातूनच केले जात होते. या पार्श्वभूमीवर एमएसएमसी बसल्याजागी कमाई करीत आहे.