शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जागेअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचार : मेयोची धक्कादायक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:07 PM

मेयो प्रशासनाने वर्षभरापूर्वीच ५०० खाटांच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. परंतु वर्ष होऊनही याला मंजुरी मिळाली नाही. जागेअभावी रुग्णांवर दाटीवाटीने तर काहींवर जमिनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे५०० खाटांच्या नव्या इमारतीला मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ब्रिटिशकालीन इमारती धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त होताच येथील वॉर्ड दुसऱ्या इमारतीत स्थानांतरित करण्यात आले. ही स्थिती येणार म्हणून मेयो प्रशासनाने वर्षभरापूर्वीच ५०० खाटांच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. परंतु वर्ष होऊनही याला मंजुरी मिळाली नाही. जागेअभावी रुग्णांवर दाटीवाटीने तर काहींवर जमिनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ आली आहे.मेयो रुग्णालय हे १८६२ मध्ये सिटी हॉस्पिटल या नावाने ओळखले जायचे. याची स्थापना ब्रिटिशांनी केली होती. १९६७ पासून राज्य सरकारकडे या रुग्णालयाचे नियंत्रण आले. ३८.२६ एकरमध्ये पसरलेल्या या रुग्णालयात आजही ब्रिटिशकालीन इमारतीमधून आतापर्यंत रुग्णसेवा दिली जात होती. मागील वर्षी बांधकाम विभागाने रुग्णालयाच्या इमारतीचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’साठी‘व्हीएनआयटी’ची मदत घेतली. दोन महिन्यापूर्वीच त्याचा अहवाल प्राप्त झाला. यात वॉर्ड क्र. ३,४, ७ व ८ असलेली ब्रिटिशकालीन इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे नमूद केले. याचे वास्तव ‘लोकमत’नेही मांडले. याची दखल घेत बालरोग विभागाचे वॉर्ड क्र. ७ व ८ हे दुसऱ्या इमारतीच्या वॉर्ड क्र. १ व २ मध्ये स्थानांतरित करण्यात आले. तर औषधवैद्यकशास्त्र विभागाचे (मेडिसीन) वॉर्ड क्र. ३ व ४ हे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या इमारतीमधील वॉर्ड २१ व २२ मध्ये स्थानांतरित करण्यात आले. परंतु अपुरी जागा, अपुऱ्या खाटांमुळे काही रुग्णांवर जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहे.

वर्षभरापूर्वी पाठविला होता नव्या इमारतीचा प्रस्तावमेयोने ५०० खाटांच्या ‘मेडिसीन ब्लॉक’ नावाच्या इमारतीसाठी गेल्या वर्षीच प्रस्ताव पाठविला होता. तीन लाख स्कवेअर फूट जागेवरील या इमारतीत मेडिसीन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अपघात विभाग, एमआयसीयू, पीआयसीयू, आयसीयू, चार शस्त्रक्रियागृह, लेबर रुम, रेडिओलॉजी विभाग प्रस्तावित आहेत. तळमजल्यासह सहा मजल्याच्या या इमारतीच्या बांधकामासाठी बांधकाम विभागाने पूर्वी २६५ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने हा खर्च खूप जास्त असल्याचे सांगून, कमी खर्चाचा प्रस्ताव पाठविण्याचा सूचना केली होती. त्यानुसार एप्रिल २०१९ मध्ये एक मजला कमी करून सुमारे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविला. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही.धोकादायक इमारतीतून वॉर्ड स्थानांतरित केलेब्रिटिशकालीन इमारत धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या इमारतीतील वॉर्ड क्र. ३, ४, ७ व ८ दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले आहेत. नव्या ५०० खाटांच्या इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.डॉ. सागर पांडेउपवैद्यकीय अधीक्षक, मेयो

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)