नागपूर : नागरिकांमध्ये भूजल साक्षरता यावी आणि जाणिवा वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी नागपुरातून भूजल साक्षरता रथ निघाला आहे. पहिल्या टप्प्यात पाच महसूल विभागांमध्ये जनगाजृती करून त्याचा समारोप १६ जुलैला पुण्यात होणार आहे.
सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यव्यापी भूजल साक्षरता अभियान सुरू आहे. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या हस्ते रथाचे उद्घाटन करण्यात आले. नागपूर विभागासह अमरावती, औरंगाबाद, नाशिक व नंतर पुणे विभागात या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उपक्रम म्हणून नागपूर विभागीय कार्यालयाकडून ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले होते. या उद्घाटन कार्यक्रमाला नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्यावतीने उपसंचालक मंगेश चौधरी, वरिष्ठ खोदन अभियंता शैलेश रंगारी, तसेच सहायक भूवैज्ञानिक उपस्थित होते.
...
रथ करणार प्रबोधन
जनतेची भूजल मागणी, भूजल साठा वाढविण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भूजल सर्व्हेक्षण विभागाचे लोगो आणि कार्य तसेच कोरोना जनजागृती अशा चार भागात रथाची विभागणी करण्यात आली आहे. यात पाणी गुणवत्ता मापन, भूजल व्यवस्थापन, छतावरील पाण्याचे शुद्ध रूपातील संकलन यासह अन्य मॉडेल्स आहेत. त्याची माहिती देण्यासाठी भूगर्भशास्त्र विभागाचे तंत्रज्ञ रथासोबत आहेत.
...
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांच्या जनजागृतीसाठी हे राज्यव्यापी अभियान सुरू आहे. भूजल पातळी वाचविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचा आणि उपक्रमांची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, संचालक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे
...