लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा शहरात असो अथवा ग्रामीण भागात जर शिक्षक व समाज प्रतिनिधी कर्तव्याला जागले तर आनंददायी शाळा निर्माण होत असतात. ही संकल्पना मनात ठेवून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी (बीईओ) प्रामुख्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण व वित्त सभापती भारती पाटील यांनी दिल्या.जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी त्यांनी गटशिक्षणाधिकाºयांना सांगितले की, जि.प.च्या स्मार्ट शाळा तयार झाल्या तर विद्यार्थी पटसंख्या वाढेल तसेच शाळेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आता पुढे शाळेचे नवीन सत्रही सुरू होणाार आहे. त्यापूर्वी सर्व जि.प. शाळांमध्ये निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी हे निर्जंतुकीकरणाचे काम करण्याच्या सूचनाही पाटील यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी व तेराही तालुक्यातील बीईओंना दिल्यात. यावेळी सदस्यांनी जि.प. शाळांची रंगरंगोटी करण्याची मागणी केली. त्यावर सभापतींनी चौदाव्या वित्त आयोगातून शिक्षणविषयक बाबींवर राखून ठेवण्यात येणाºया निधीतून शाळेची रंगरंगोटी करण्याबाबत पंचायत विभागचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना सूचना देण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी वंजारी यांना दिले. सभेमध्ये इतर विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. जि.प.च्या आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या या समिती सभेत सदस्य शांता कुमरे, प्रकाश खापरे, दुधाराम सव्वालाखे, मोहन माकडे, सुनीता ठाकरे, राजेंद्र हरडे, उपशिक्षणाधिकारी, सर्व बीईओ उपस्थित होते. सामाजिक अंतराचे पालन करून ही सभा पार पडली.
स्मार्ट शाळेसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा : शिक्षण सभापतींच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 7:33 PM
शाळा शहरात असो अथवा ग्रामीण भागात जर शिक्षक व समाज प्रतिनिधी कर्तव्याला जागले तर आनंददायी शाळा निर्माण होत असतात. ही संकल्पना मनात ठेवून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी (बीईओ) प्रामुख्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण व वित्त सभापती भारती पाटील यांनी दिल्या.
ठळक मुद्देबैठकीत जाणून घेतली शिक्षणाची अवस्था