नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी लाभार्थ्यांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ नोंदविण्यात आली. यात मंगळवारी जिल्ह्यात लक्ष्यापेक्षा ५४.६६ टक्केच लाभार्थ्यांनी लस घेतली होती. तर बुधवारी जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १२०० लाभार्थ्यांपैकी ९२१ लाभार्थ्यांनी लस घेतली. एकूण ७६.८ टक्के लाभार्थ्यांनी लस घेतली. नागपूर शहरात ६४.८ टक्के तसेच ग्रामीणमध्ये ८५.३ टक्के लाभार्थ्यांनी लस घेतली. नागपूर शहरात ५ केंद्रांवर ५०० लाभार्थ्यांचे लक्ष्य होते. यात ३२४ लाभार्थ्यांनी लस घेतली. तर ग्रामीणमधील ७ केंद्रांवर ७०० पैकी ५९७ लाभार्थ्यांनी कोवॅक्सिन लावली. रामटेकमध्ये १०० चे लक्ष्य होते, परंतु येथे ११४ जणांनी लस घेतली. सावनेरमध्ये १०२ जणांनी, कामठीत सर्वांत कमी ५८ जणांनी लस घेतली. नागपूर शहरात एम्समध्ये ८६, मेयोत ८५, मेडिकलमध्ये ५२, पाचपावलीत ६४, डागात ३७ जणांना लस देण्यात आली.
...........
केंद्र लसीकरण
एम्स ८६
मेडिकल ५२
डागा ३७
मेयो ८५
पाचपावली ६४
हिंगणा ८९
कामठी ५८
काटोल ७३
रामटेक ११४
सावनेर १०२
उमरेड ८५
डिगडोह ७६
.........