लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे शाळेला सुट्या लागल्या आहेत. वर्ग १ ते ९ पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करून पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रविष्ट केले आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडता येत नाही, अशात घरी बसून विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासात जावा म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षा अॅपच्या माध्यमातून अभ्यासमाला सुरू केली आहे. नागपुरात ९९,२४८ विद्यार्थ्यांनी दीक्षा अॅपच्या माध्यमातून अभ्यासाला सुरुवात केली आहे.दीक्षा अॅपचा वापर करण्यास विभागात नागपूर अव्वल स्थानी आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात ५५,०२९ युझर दीक्षा अॅपद्वारे अभ्यास करीत आहेत. दीक्षा अॅपमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी स्वतंत्र लॉगईन असल्याने विद्यार्थ्यांनी काय करावे, शिक्षकांनी कसे शिकवावे या सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे सर्व भाषेतील व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन अभ्यासमालेचा यात समावेश आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांना एनसीआरटीईच्या दीक्षा अॅपच्या माध्यमातून ऑलनाईन पद्धतीने दररोज शालेय अभ्यासकम शिकविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.कोरोनामुळे राज्यात १६ मार्चपासून शाळा बंद करण्यात आला. तेव्हापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आता पूर्ण होत आहे. परंतु कोरोना पॉझिटिव्हची राज्यात वाढत असलेली संख्या लक्षात घेता, राज्य सरकारला चौथ्यांदा लॉकडाऊन करणे भाग पडणार आहे. त्यामुळे २०२०-२१ या वर्षात शाळेचे सत्र कधी सुरू होते, याचा नेम नाही. अशात शिक्षण विभाग दीक्षा अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास करवून घेत आहे.- शिक्षण विभागाला दिली जबाबदारीजिल्ह्यात इयत्तानिहाय विद्यार्थ्यांचे, पालकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यांच्यापर्यंत दीक्षा अॅप पोहचविण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुखांना दिली आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सूचना दिल्या आहे. त्याचा परिणाम म्हणून नागपूर जिल्ह्यात दीक्षा अॅपचे ९९ हजारांवर युझर झाले आहेत.- दीक्षा अॅपची वैशिष्ट्येवर्ग १ ते ९ पर्यंतच्या सर्व विषयांच्या सर्व धड्यांचा अॅपमध्ये समावेशपाठ्यपुस्तक, व्हिडिओचा समावेशएनसीआरटीई द्वारे रोज एका विषयाची अभ्यासमालिकासर्व माध्यमांसाठी अॅपचा वापर शक्य- नागपूर विभागात अॅप युझरनागपूर - ९९,२८४भंडारा - ५५,०२९चंद्रपूर - २२,६०५गडचिरोली - १३,९६४वर्धा - १४,०११गोंदिया - ६,९८७