लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ संक्रमण थांबविण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊनची घोषणा केली. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार होते. असे असताना नागपुरात शुक्रवारी पुन्हा एका संक्रमणाचा ब्लास्ट झाला. त्यामुळे लॉकडाऊन संपण्याच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. आता शहरातील नागरिकसुद्धा प्रश्न करीत आहे की अखेर लॉकडाऊन संपण्याच्या तोंडावरच कोरोनाचे संक्रमण अचानक कसे वाढते.विशेष म्हणजे सरकारद्वारे आतापर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवसातच शहरात संक्रमित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसते आहे. मात्र सामान्य माणूस आता लॉकडाऊन संपेल अशी अपेक्षा बाळगून आहे. अशात लॉकडाऊन संपण्याचा अवधी जवळ येत असताना शहरात संक्रमण वाढते आहे. मार्च महिन्यात केवळ १६ रुग्ण कोरोनाचे होते. एप्रिल महिन्यात नागपुरात संक्रमण वेगाने वाढले. केंद्र सरकारने कोविड-१९ ला आळा घालण्यासाठी आतापर्यंत चार वेळा लॉकडाऊनची घोषणा केली. पहिला लॉकडाऊन २५ मार्च ते १४ एप्रिल, दुसरा १५ एप्रिल ते ३ मे, तिसरा ४ मे ते १७ मे व चौथा लॉकडाऊन १८ ते ३१ मे दरम्यान लागू करण्यात आला. पहिला लॉकडाऊन संपण्यापूर्वी १२ एप्रिल रोजी १७ रुग्ण, १३ एप्रिल रोजी ३ व १४ एप्रिल रोजी ९ रुग्ण संक्रमित आढळले.दुसरा लॉकडाऊन संपण्यापूर्वी १ व २ मे रोजी १२ संक्रमित मिळाले. तिसरा लॉकडाऊन सुरू होण्यासोबतच कोविड-१९ च्या संक्रमित रुग्णांची संख्या अचानक वाढली. ६ मे रोजी ६८, ७ मे रोजी ३८ रुग्ण पॉझिटीव्ह मिळाले. अशात तिसरे लॉकडाऊन संपतच असताना १३ मे रोजी ११, १५ मे रोजी १८ व १६ मे रोजी पाचवा बळी गेला व ५ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. आता चौथे लॉकडाऊन संपण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढली आहे. २७ मे रोजी नवव्या संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला व १३ पॉझिटीव्ह आढळले. २८ मे रोजी १२ पॉझिटीव्ह व २९ मे रोजी ४३ पॉझिटीव्ह आढळले.
लॉकडाऊन संपण्याच्या तोंडावरच वाढतेय संक्रमण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:00 PM
कोविड-१९ संक्रमण थांबविण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊनची घोषणा केली. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार होते. असे असताना नागपुरात शुक्रवारी पुन्हा एका संक्रमणाचा ब्लास्ट झाला. त्यामुळे लॉकडाऊन संपण्याच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. आता शहरातील नागरिकसुद्धा प्रश्न करीत आहे की अखेर लॉकडाऊन संपण्याच्या तोंडावरच कोरोनाचे संक्रमण अचानक कसे वाढते.
ठळक मुद्देजनतेच्या लॉकडाऊन संपण्याच्या अपेक्षेवर फेरतेय पाणी : तिसऱ्या लॉकडाऊन दरम्यान वाढले सर्वाधिक रुग्ण