लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुप्तचर जीएसटी संचालनालयाच्या (डीजीजीआय) कारवाईत दोन मद्य उत्पादकांनी १०८ कोटींची जीएसटी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विभागाने जागेवरच २.५ कोटी रुपये जीएसटी वसूल केला.प्राप्त माहितीच्या आधारे नागपूर केंद्रीय जीएसटी झोन अंतर्गत औरंगाबाद विभागीय युनिटने २८ आणि २९ जुलैला नांदेड आणि औरंगाबाद येथील दोन मद्य उत्पादकांवर कारवाई केली. नांदेडच्या डिस्टलरीद्वारे माल्ट स्पिरिटच्या पुरवठ्यात जीएसटी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. जुलै २०१७ ते जून २०२० पर्यंत करदात्याने १२.६१ कोटींचा जीएसटी न भरता ७०.०३ कोटी रुपयांच्या माल्ट स्पिरिटचा पुरवठा केल्याचे कागदपत्रांच्या तपासणीत दिसून आले. करदाता अल्कोहोलच्या पुरवठ्यावर जीएसटी देत होते. परंतु मोठ्या प्रमाणात अशा अल्कोहोलवर जीएसटीबाबत अनिवार्यता पूर्ण केली नाही.या करदात्यांनी उपरोक्त कालावधीत मानवी सेवनासाठी अनुपयुक्त ४७६ कोटी रुपयांच्या अल्कोहोलचा पुरवठा केला, पण त्यावर ८५.६८ कोटींचा जीएसटी चुकविला नाही. त्यानंतरही सॅनव्हॅट क्रेडिट घेतला. सॅनव्हॅट क्रेडिटच्या नियमानुसार त्यांना ५ कोटी रुपये द्यायला हवे होते. या प्रकारे करदात्यांनी १०८ कोटी रुपयांच्या जीएसटीची चोरी केल्याचा खुलासा झाला. यावर एका करदात्याने २.५० कोटी रुपयांचा जीएसटी जागेवरच जमा केला आहे तर दुसऱ्या करदात्याने पुढील दोन महिन्यात ही रक्कम भरण्याची परवानगी मागितली आहे.
दोन मद्य उत्पादकांची १०८ कोटींची जीएसटी चोरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:06 PM
गुप्तचर जीएसटी संचालनालयाच्या (डीजीजीआय) कारवाईत दोन मद्य उत्पादकांनी १०८ कोटींची जीएसटी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विभागाने जागेवरच २.५ कोटी रुपये जीएसटी वसूल केला.
ठळक मुद्दे डीजीजीआयची कारवाई : २.५० कोटी रुपये वसूल