शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

‘जीएसटी’ नोंदणी, व्यापाऱ्यांना डोकेदुखी

By admin | Published: April 28, 2017 2:57 AM

बहुप्रतीक्षित ‘जीएसटी’ची (गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) जुलै महिन्यापासून अंमलबजावणी होणार असून,

तांत्रिक अडथळे : अनेक व्यवसायांचा ‘कोड’च उपलब्ध नाही, साखळी उद्योग असलेल्यांना फटका नागपूर : बहुप्रतीक्षित ‘जीएसटी’ची (गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) जुलै महिन्यापासून अंमलबजावणी होणार असून, यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. व्यापाऱ्यांना आता ‘जीएसटी’अंतर्गत ‘आॅनलाईन’ नोंदणी करायची आहे. मात्र या नोंदणी प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडथळे असून, किचकट पद्धतीमुळे व्यापारी हैराण झाले आहेत. काही व्यवसायांच्या ‘एसएसएन’ कोडचा नोंदणी प्रक्रियेत समावेश झालेला नाही. अशा स्थितीत नोंदणी होणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.‘जीएसटी’अगदी जवळ येऊन ठेपला असून, व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाचे ‘व्हॅट’मधून नव्या कराच्या प्रक्रियेत स्थलांतर करायचे आहे. ‘एसीईएस’ या संकेतस्थळावर जाऊन व्यापाऱ्यांना येथे अगोदर नोंदणी करणे अनिवार्य आहे. एकदा का ‘आॅनलाईन’ खाते तयार झाले की व्यवसायाशी निगडित सखोल माहिती तेथे भरायची आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याचे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘एचएसएन’ कोडच नाही नोंदणी करताना ‘एचएसएन’ कोड (हार्मोनाईझ्ड सिस्टम नॉमनक्लेचर) टाकणे अनिवार्य आहे. शहरातील मोठ्या प्रमाणात किराणा, सौरऊर्जा, ई-रिक्षा इत्यादींशी संबंधित व्यापारी आहेत. काहींचा रवा, मैदा, सोजी यासारखे उत्पादन बनविण्याचा व्यवसाय आहे. मात्र या उत्पादनांचा ‘एचएसएन’ कोड उपलब्धच होत नसल्याने आपल्या व्यवसायाची नोंदणी कशी करावी, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. यासोबतच सौरऊर्जा, ई-रिक्षा उत्पादनांचा यात समावेश नाही. केंद्रीभूत नोंदणीत अडचण अनेक बँका किंवा औद्योगिक प्रतिष्ठानांच्या शहर, राज्य किंवा देशात विविध ठिकाणी शाखा आहेत. या सर्व शाखांची माहिती केंद्रीभूत नोंदणीनुसार न देता स्वतंत्रपणे द्यायची आहे. सुरुवातीला काही अडचण येत नाही. मात्र १०-१२ शाखांची माहिती दिल्यानंतर तांत्रिक अडचणी येतात. सर्व शाखांचा पत्ता, फोन क्रमांक, पिन कोड टाकणे अशक्य होत आहे. त्यामुळेच सेवाकरानुसार येथेदेखील ‘अपलोड’ची सुविधा देणे अपेक्षित आहे. मुख्य व्यवसाय काय ? ‘जीएसटी’साठी नोंदणी करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांचे विविध व्यवसाय आहेत. तुमचा मुख्य व्यवसाय काय, अशी यात विचारणा करण्यात येत आहे. ज्यांचे अनेक व्यवसाय आहे, त्यांना मुख्य व्यवसाय काय हे सांगणे कठीण जात आहे. ‘सीए’ना देखील अडचणी बऱ्याच व्यापाऱ्यांना ‘आॅनलाईन’ प्रणालीची माहिती नसते. त्यामुळे ते ‘सीए’च्या माध्यमातून नोंदणी करून घेत आहेत. मात्र ‘सीए’नादेखील या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच ‘सीए’कडून याबाबत तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात आम्ही निवेदन तयार केले असून ते प्रशासनाकडे सोपविणार आहोत, असे नागपूर सीए असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जोतवानी यांनी सांगितले.