शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

जीएसटीमुळे विकासाला अधिक निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2016 2:55 AM

जीएसटी कायद्यामुळे विक्रीकराच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : विक्रीकर दिन उत्साहातनागपूर : जीएसटी कायद्यामुळे विक्रीकराच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. यासाठी व्यापारी व उद्योजकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सुलभ व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विक्रीकर विभागातर्फे शनिवारी विक्रीकर दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते, तर विशेष अतिथी म्हणून खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, क्रिकेटपटू प्रशांत वैद्य आणि नागपूर विभागाचे विक्रीकर सहआयुक्त पुनमचंद अग्रवाल उपस्थित होते.गडकरी म्हणाले, जीएसटी या नव्या करप्रणालीमुळे महाराष्ट्राला एक लाख कोटीपर्यंत कर मिळणार आहे. सर्वाधिक कर स्वरूपात उत्पन्न मिळविणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. उद्योजक व व्यवसायिक कर भरण्यासाठी सकारात्मक राहतात. परंतु क्लिष्ट पद्धतीमुळे कर जमा करण्यास टाळाटाळ होते. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करप्रणालीमध्ये पारदर्शकता आणल्यास राज्यातील उत्पन्न वाढेल. परिवहन विभागात डिजिटल लॉकरची सुविधा निर्माण होणार असून याद्वारे १८ कोटी लोकांना वाहनाची सर्व कागदपत्र डिजिटल स्वरूपात वाहन तपासणीच्या वेळी दाखविता येतील. यामुळे प्रशासनामध्ये पारदर्शकता येऊन वाहन चालकांनाही त्रास होणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) विभाग ‘झिरो डिफॉल्टर’ जाहीरविक्रीकर विभागाच्या २२ विभागात नागपूर विभाग ‘झिरो डिफॉल्टर’ जाहीर झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले दावे आणि प्रकरणे अधिकाऱ्यांनी ३१ मार्च २०१६ पर्यंत जवळपास ४ हजारांपेक्षा जास्त दावे निकाली काढली काढून १८० कोटींपेक्षा जास्त महसूल गोळा केला. यात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाटा आहे. याकरिता नियोजनबद्ध कार्यक्रम व सतत पाठपुरावा हा महत्त्वाचा भाग राहिला आहे. प्रास्तविकेत सहआयुक्त पुनमचंद अग्रवाल म्हणाले, विक्रीकर विभागातर्फे राज्याच्या प्रगतीमध्ये व जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये विक्रीकर विभागाचा सिंहाचा वाटा आहे. राज्याला विक्रीकरातून ९० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी विक्रीकर विभाग सज्ज आहे.विक्रीकर उपायुक्त गजेंद्र राऊत, उपायुक्त सतीश लंकेतिलेवार, चंद्रकांत कच्छवे, प्रदीप बोरकर, राजेश पारेकर आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन दिनेश मासोदकर यांनी कले. आभार विक्रीकर उपायुक्त किशोर खांडेकर यांनी मानले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अधिकाऱ्यांना घरी पाठवाअनेक अधिकारी निर्णय घेत नाही आणि फाईल्स दाबून ठेवतात. तीन दिवसांत अधिकारी निर्णय घेत नसेल तर त्यांना घरी पाठवा. कामाच्या बाबतीत माझा विभाग उत्कृष्ट उदाहरण आहे. विक्रीकर विभाग सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. उद्योग मंदीत असल्यामुळे कोंबडी संकटात असल्याचे गडकरी म्हणाले.व्यापारी व उद्योजकांचा सत्कारप्रामाणिक व कालमर्यादेत जास्तीत जास्त कराचा भरणा केलेले आरएसपीएल लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुक्ला, कोमात्सू इंडिया लि.चे चंदन गाबरानी, उत्तम गाल्व्हा मेटालिक्स चंद्रपूरचे ओमप्रकाश आहुजा, रुची सोया इंडस्ट्रीजचे महेश माहेश्वरी, अंबुजा सिमेंट चंद्रपूरचे संदीप पोखरणा, जिल्हास्तरावर अरोदया सेल प्रा.लि.चे संचालक आर्य, बरबटे आॅटोमोटिव्हचे संचालक विशाल बरबटे व मॅनकार्इंड फार्माचे गणेश साहू यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा गौरवकर संकलनात प्रामाणिक व अतिउत्कृष्ट कार्याबद्दल विक्रीकर निरीक्षक मंगेश गंगाखेडकर, दिलीप सावलकर, विक्रीकर अधिकारी किशोर कायरकर, सहायक विक्रीकर आयुक्त अश्विनी बिजवे, विक्रीकर उपायुक्त मोरेश्वर दुबे यांचा स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.