लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने जीटी एक्स्प्रेसमधून दारूच्या ७७०० रुपये किमतीच्या ११० बॉटल जप्त केल्या. ही कारवाई रविवारी दुपारी १.१० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर करण्यात आली.रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा यास रेल्वेगाडी क्रमांक १२६१६ जीटी एक्स्प्रेसने दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याने याची सूचना आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांना दिली. त्यांनी उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, आर. पी. त्रिपाठी, विकास शर्मा, विवेक कनोजिया, उमेश सिंह यांची चमू गठित केली. चमूने जीटी एक्स्प्रेस दुपारी १.१० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर आल्यानंतर या गाडीच्या एस १ कोचची तपासणी केली. यावेळी त्यांना एक बॅग बेवारस आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांनी ही बॅग आपली नसल्याचे सांगितले. बॅगची तपासणी केली असता त्यात दारुच्या ७७०० रुपये किमतीच्या ११० बॉटल होत्या.जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
जीटी एक्स्प्रेसमध्ये दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:19 AM
रेल्वे सुरक्षा दलाने जीटी एक्स्प्रेसमधून दारूच्या ७७०० रुपये किमतीच्या ११० बॉटल जप्त केल्या. ही कारवाई रविवारी दुपारी १.१० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर करण्यात आली.
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन