शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

गुडिया शाहू दयेस पात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 11:48 PM

उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या निर्घृण खून प्रकरणातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू ही कोणत्याही प्रकारच्या दयेस पात्र नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचे निरीक्षण : कांबळे दुहेरी खुनातील आरोपी

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या निर्घृण खून प्रकरणातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू ही कोणत्याही प्रकारच्या दयेस पात्र नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे.उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी काही दिवसांपूर्वी गुडियाचे जामिनासंदर्भातील अपील फेटाळून लावले. त्या निर्णयामध्ये हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. गुडिया गर्भवती महिला आहे, या केवळ एका कारणामुळे तिच्यावर दया दाखविली जाऊ शकत नाही. उषा कांबळे व त्यांची दीड वर्षीय चिमुकली नात राशी यांचा निर्घृण खून झाला असून हा अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. घटना घडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला हे दाखविणारे भरपूर दस्तावेज रेकॉर्डवर उपलब्ध आहेत. ते लक्षात घेता या गुन्ह्यामध्ये गुडियाचा प्रत्यक्ष सहभाग असण्याची शक्यता नाकारत येत नाही असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. सत्र न्यायालयाने गुडियाचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. या प्रकरणात गुडियाचा पती गणेश शाहू मुख्य आरोपी आहे. घटनेच्या दिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांचा भिसीच्या सात हजार रुपयांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. तसेच, दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखून