शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

पालकमंत्री शेतकºयांच्या दारी, वरिष्ठ अधिकारी मात्र घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:50 AM

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी कीटकनाशक फवारणीमुळे मृत पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

ठळक मुद्देकीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू प्रकरण : मृत शेतकºयांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी कीटकनाशक फवारणीमुळे मृत पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबियांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु या भेटीदरम्यान अधिकाºयांची पुन्हा एकदा उदासीनता दिसून आली. पालकमंत्री मृत शेतकºयांच्या घरी भेट देत असताना एक-दोन वगळता वरिष्ठ अधिकाºयांनी या भेटीकडेच पाठ फिरवली.जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकºयांचे मृत्यू झाले. परंतु ही गोष्ट अधिकाºयांनी लोकप्रतिनिधींपासून लपवून ठेवली. पालकमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी तातडीची बैठक बोलावली. त्या बैठकीत अधिकाºयांना सविस्तर माहिती विचारली असता कृषी अधिकाºयांना किती शेतकरी मृत्युमुखी पडले याची माहितीच देता आली नाही. तसेच महसूल, पोलीस आणि कृषी विभागाच्या अधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याचेही दिसून आले. तेव्हा पालकमंत्र्यांनी तिन्ही विभागातील अधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले होते. तसेच मृतांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करा व त्यांना योग्य ती मदत करा, असे निर्देशही दिले होते. या निर्देशाला अधिकाºयांनी केराची टोपली दाखविली.बुधवारी स्वत: पालकमंत्र्यांनी जेव्हा मृत शेतकºयांच्या घरी भेटी दिल्या. त्यावेळी कळमेश्वरच्या तहसीलदार डॉ. मोहने व तालुका कृषी अधिकारी जगदीश नेरुलवार हे अधिकारी सोडले तर महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षकासह वरिष्ठ अधिकाºयांनी या दौºयाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकºयांच्या या मृत्यूबाबत एकूणच अधिकाºयांची असंवेदनशीलता व उदासीनता पुन्हा एकदा दिसून आली. पालकमंत्र्यांनी यासंदर्भात आपली नाराजीही व्यक्त केली.कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या नरखेड तालुक्यातील खैरगाव येथील धनंजय वरोकार व कळमेश्वर येथील माणिक शेंडे यांच्या निवासस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनातर्फे शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी पालक मंत्र्यांसोबत काटोलचे आ. डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते.खैरगाव येथील धनंजय वरोकार यांचा ७ आॅक्टोबरला कीटकनाशक फवारणी सुरू असताना झालेल्या विषबाधेने मृत्यू झाला. या घटनेमुळे वरोकार कुटुंबावर शोककळा पसरली होती. पालकमंत्री बावनकुळे यांनी वरोकार यांच्या निवासस्थानी भेट देऊन घटनेची माहिती घेतली व मृत धनंजय यांच्या कुटुंबाना धीर दिला. या प्रसंगी त्यांच्या सोबत जिप सदस्य उकेश चव्हाण, गटविकास अधिकारी हिवंज, दिनकर राऊत, नरखेडचे नगराध्यक्ष गुप्ता, भाजपाचे अरविंद गजभिये, किशोर रेवतकर, संजय टेकाडे उपस्थित होते.कमळेश्वर येथेही माणिक शेंडे या मृताच्या निवासस्थानी पालकमंत्र्यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. डॉ.आशिष देशमुख, सोनबा मुसळे, अरविंद गजभिये, प्रकाश टेकाडे, संजय टेकाडे, किशोर रेवतकर, दिलीप धोटे, प्रकाश वरुडकर पालकमंत्र्यांसोबत होते. याच दौºयादरम्यान काटोल नरखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेलोना, लोहारीसावंगा, किनखेडा, तिनखेडा, झिलपा, दुधाळा या गावांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.महिला बिल्डरला अटक(पान १ वरून) न्यू शेल्टर इंटरप्रायजेसने अपार्टमेंटचे बांधकाम करण्याचा करार केला. हा करार १५ एप्रिल २०१४ रोजी करण्यात आला होता. यानुसार माझगांवकर दाम्पत्य अपार्टमेंटचे बांधकाम करून गुप्ता दाम्पत्याला तळ मजल्यावर फ्लॅट आणि रोख रक्कम देणार होते. मीनाक्षी गुप्ता यांच्या तक्रारीनुसार करार केल्यानंतर काही दिवसांनी सलीलने त्यांच्याकडून टीडीआर खरेदी करण्याच्या नावावर ७० लाख रुपये मागितले होते. या रकमेच्या बदल्यात तीन प्लॅट देण्याचा करारही केला. यानंतर पुन्हा तिसरा करार करून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले. या दरम्यान सुधीर गुप्ता यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. ते बाहेरगावी गेले. त्यांच्या अनुपस्थितीत रश्मी माझगांवकरने २२ सप्टेंबर २०१६ रोजी मीनाक्षी गुप्ता यांच्याकडून ‘अ‍ॅग्रीमेंट फॉर डेव्हलपमेंट’ केले. रश्मीने मीनाक्षीला आठ फ्लॅट देण्याचा करार केला. तेव्हापासून दोघांमध्ये वाद होऊ लागला. गुप्ता दाम्पत्य रश्मीला फ्लॅटचा ताबा मागू लागले. वाद वाढल्याने मार्चमध्ये गुप्ता यांच्याविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आला. गुप्ता यांनी त्यांना खोट्या प्रकरणात फसवण्यात येत असल्याची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही दिवसांपूर्वी मीनाक्षी गुप्ताने आर्थिक गुन्हे शाखेत रश्मीच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी केली. य चौकशीत रश्मीने मीनाक्षीसोबत करार करण्यापूर्वीच आठपैकी एक फ्लॅट सहा लोकांना विकल्याचे आढळून आले. रश्मीला या प्रकारचा करार करण्याचा अधिकारही नव्हता. या आधारावर आर्थिक गुन्हे शाखेने सलील आणि रश्मीच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करून रश्मीला अटक केली. तिला १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. सलील मर्चट नेव्हीमध्ये तैनात आहे. पोलिसांनी त्याच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेळकर यांनी सांगितले की, पोलिसांनी सर्व गोष्टींचा चौकशीनंतरच गुन्हा दाखल केला आहे.नेता आणि विधि तज्ज्ञांचाही सहभागसूत्रानुसार पूर्ण प्रकरण हे पैशाच्या देवाण-घेवाणीशी संबंधित आहे. अपार्टमेंटचे बांधकाम सुरू झाल्याच्या काही दिवसानंतरच वाद सुरू झाला होता. गुप्ताने बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खरा प्रकार सांगण्याचा पय्रत्न केला. परंतु पोलिसांनी त्याचे काहीही ऐकले नाही. या प्रकरणात नेता आणि विधी तज्ज्ञांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या स्तरावर प्रकरणाला हवा देण्याचा प्रयत्न केला होता.