१०१ वी दीक्षांत परेड : १५२ जवानांना सैनिकांचा दर्जा नागपूर : कामठी येथील ब्रिगेड आॅफ दि गार्डस् रेजिमेंटच्या १०१ व्या अभ्यासक्रमाच्या १५२ जवानांना दीक्षांत सोहळ्यात लढाऊ सैनिकाचा दर्जा मिळाला. शुक्रवारी कामठी येथील परेड ग्राऊंडवर आयोजित समारंभात या प्रशिक्षित जवानांना हा सन्मान देण्यात आला. ३४ आठवड्याच्या कठोर शारीरिक व मानसिक प्रशिक्षणानंतर त्यांनी हा दर्जा पटकावला. अनेक दशकापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार रेजिमेंट दंडपालाकडून कर्तव्याप्रती त्याग आणि बलिदानाची शपथ घेतली. या प्रशिक्षणाबरोबरच देशाच्या सीमेवर प्रशिक्षित सैनिकांमध्ये सहभागी झाले आहे. ब्रिगेड आॅफ दि गार्डस् रेजिमेंटल सेंटरचे कमांडेंट ब्रिगेडियर डी.व्ही. सिंह यांनी दीक्षांत परेडचे अवलोकन केले. प्रशिक्षणादरम्यावन विविध उपक्रमांतर्गत चांगले प्रदर्शन करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याला पदक देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शनासाठी पताप ट्रेनिंग कंपनीचे रिक्रुट रवींद्र कुमार यांना चषक प्रदान करण्यात आला. ब्रिगेड आॅफ दि गार्डस्ची स्थापना तत्कालीन फिल्ड मार्शल के.एम. करियप्पा यांनी १९५० मध्ये केली होती. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच रेजिमेंट होती. सर्वप्रथम ही रेजिमेंट दिल्लीत होती. १९५६ मध्ये ती कोटा येथे स्थानांतरित करण्यात आली. १९७६ पासून ती कामठीमध्ये स्थापित करण्यात आली. (प्रतिनिधी)
गार्डस् जवान बनले लढाऊ सैनिक
By admin | Published: July 18, 2015 3:10 AM