वेलतूर : स्थानिक ज्येष्ठ नागरिक मंडळ व पाेलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वेलतूर (ता. कुही) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ज्येष्ठ नागरिकांना घरगुती भांडणे, अत्याचार, हिंसाचार, आराेग्य, काेराेनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी वेलतूरचे ठाणेदार आनंद कविराज तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुढेकर, डॉ. दीपक तलमले, केशवराव वाडीभस्मे, डॉ. केवळराम तितरमारे, हरिदास लुटे, भास्कर भोंगाडे, डॉ. पठाण, मदन खडसिगे उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी सरपंच प्रभाकर चौधरी, वसंतराव तितरमारे, भोपाल अतकरी, जनार्दन तेलरांधे, हिरामण लांबट, भास्कर भोंगाडे, भय्याजी टांगले, भगवान सातपैसे, अशोक डोंगरे, महादेव तितरमारे, भगवान महाकाळकर, रतिराम कावळे, फागो कावळे, रंगराव कुलरकर, नामदेव तितरमारे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.