नागपूर : उद्योग क्षेत्रात यशस्वी झेप घेऊ इच्छिणाऱ्या युवा उद्योजकांना अधिकाधिक विकसित करण्यासाठी विको लेबॉरेटरीज् प्रा.लि.चे संचालक संजीव पेंढरकर यांनी प्रेरणादायी भाषण दिले. २६ मे रोजी मुंबईतील दादरमधील हॉटेलमध्ये शैक्षणिक कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पुरस्कार विजेते डॉ. उमेश कणकवलीकर उपस्थित होते.पेंढरकर यांनी विको लॅबोरेटरीज्ची ६५ वर्षांची यशोगाथा सांगितली. भारतीय आणि परदेशी ग्राहकांशी व्यवहार करताना येणाºया अडचणी दूर करण्याकरिता आणि लक्ष्य निश्चित करण्याकरिता तसेच या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी असलेले चिकाटीचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले.लक्ष्य कसे निश्चित करावे आणि आवडीचे लक्ष्य का निवडावे, आवड असलेल्या कारकिर्दीची निवड करावी, यावर मार्गदर्शन केले. उद्योगक्षेत्रात विक्रेत्यांची नेमणूक, किरकोळ विक्रेत्यांसाठी कमिशनची निश्चिती तसेच वैयक्तिक व्यवसायामध्ये व्यावहारिकदृष्ट्या कसे यशस्वीव्हावे, याचा कानमंत्र पेंढरकरयांनी दिली. नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन करणे हा माझ्याकरिता नेहमीच आनंदाचा क्षण असल्याचेही सांगितले. (वा. प्र.)
विकोतर्फे नवउद्योजकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 6:48 AM