शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपाचा गल्ला लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घातक शस्त्राचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना मारहाण करत तीन दरोेडेखोरांनी पेट्रोल पंपावरची सव्वादोन लाखांची रोकड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घातक शस्त्राचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना मारहाण करत तीन दरोेडेखोरांनी पेट्रोल पंपावरची सव्वादोन लाखांची रोकड लुटून नेली. सोमवारी मध्यरात्री वर्धा मार्गावरच्या आशिष ऑटोमोबाइल्स नामक पेट्रोलपंपावर ही घटना घडली.

सोमलवाडा चौकाजवळ सोनेगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर उज्ज्वलनगरात हा पेट्रोलपंप आहे. गांधीनगरातील रोहन राठोड यांच्या मालकीच्या या पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री १०.३० पर्यंत कर्मचाऱ्यांनी व्यवहार केला. त्यानंतर पंप बंद करून दोन कर्मचारी घरी निघून गेले तर ब्रह्मानंद शुक्ला आणि आशिषप्रसाद काैशलप्रसाद पांडे हे दोन कर्मचारी दिवसभराचा हिशेब करू लागले. २ लाख, ३० हजार रुपयांची रोकड पंपाच्या केबिनमधील ड्रॉवरमध्ये ठेवल्यानंतर शुक्ला आणि पांडेने जेवण केले. रात्री १२.३० च्या सुमारास ते झोपण्याच्या तयारीत असताना हातात कुऱ्हाड आणि सुरा घेऊन तीन आरोपी केबिनमध्ये शिरले. त्यांनी शुक्ला आणि पांडेला मारहाण करून जीवे मारण्याचा धाक दाखवला तसेच ड्रॉवरमधील २ लाख, ३० हजारांची रोकड घेऊन आरोपी पळून गेले. शुक्ला आणि पांडेने या घटनेची माहिती आधी पंपमालक राठोड यांना कळविली. राठोड यांनी सोनेगाव पोलिसांना सांगितले. त्यानंतर सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर आपल्या ताफ्यासह पंपावर पोहोचले. गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक, ठसेतज्ज्ञही पोहोचले.

पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी पंपावरील तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. माहिती कळताच परिमंडळ दोनच्या उपायुक्त विनिता साहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनीही पेट्रोलपंप तसेच सोनेगाव ठाण्यात धाव घेतली. पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना शोधून काढण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके कामी लावण्यात आली. मात्र, २० तासांनंतरही आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते.

---

सराईत गुन्हेगाराचे कृत्य

२४ तास वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा मार्गावर ही लूटमार घडवून आणणारे सराईत गुन्हेगार असावे, असा संशय आहे. त्यांनी आपली कार रस्त्याच्या (दुभाजकाच्या) पलीकडे हॉटेल सेंटर पॉइंटजवळ उभी करून ठेवली होती. कारमध्ये आरोपींचे आणखी साथीदार असावे, असाही संशय आहे. घटना घडण्यापूर्वी आपण किंवा आपली कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये, यासाठी आरोपींनी पुरेपूर प्रयत्न केल्याचे एकूण घडामोडीवरून दिसून येते.

---

वर्षभरापूर्वी घडली होती लूटमारीची घटना

या पेट्रोलपंपावर काही महिन्यांपूर्वी लूटमारीची घटना घडली होती. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी पंपावरच्या कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करून किरकोळ रक्कम लुटून नेली होती. या घटनेचा आताच्या लूटमारीशी काही संबंध आहे का, त्याचाही तपास पोलीस करीत आहेत.

----