शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

‘गटार’ने मांडले स्वच्छतादूतांचे दाहक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 1:30 AM

मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुंबाचा आक्रोश थांबावा म्हणून झोपडपट्टीतील मलूल चेहरे हे किळसवाणे काम करीत असतात. जातवास्तवाचे हे ओझे घेऊन नरकयातना भोगणाऱ्या या समूहाचे वास्तव रंगमंचावर मांडणाऱ्या ‘गटार’ या एकांकिकेचा २५ वा प्रयोग मंगळवारी सादर झाला आणि ही दाहकता प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक प्रेक्षक स्तब्ध झाला.

ठळक मुद्देएकांकिकेच्या २५ व्या प्रयोगात प्रेक्षक स्तब्ध : कलावंतांचाही सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुंबाचा आक्रोश थांबावा म्हणून झोपडपट्टीतील मलूल चेहरे हे किळसवाणे काम करीत असतात. जातवास्तवाचे हे ओझे घेऊन नरकयातना भोगणाऱ्या या समूहाचे वास्तव रंगमंचावर मांडणाऱ्या ‘गटार’ या एकांकिकेचा २५ वा प्रयोग मंगळवारी सादर झाला आणि ही दाहकता प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक प्रेक्षक स्तब्ध झाला.गटार साफ करणाऱ्यांचे अनुभव कथनातून, पुस्तकातून वाचले, ऐकले आहेत. पण हे वेदनादायी जगणे रंगमंचावर मांडणे हे खरे तर आव्हानात्मक आहे. गटार, गटारांचे मेनहोल, तेथे उतरून काम करणारे लोक, हे काम करणाऱ्यांची वस्ती आणि तेथील जीवन हे सर्व अगदी हुबेहूब नाटकाच्या फार्ममध्ये आणणे सोपे नाही. मात्र लेखक-दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी हे आव्हान पेलले आणि त्यांच्या बहुजन रंगभूमीने या खऱ्या स्वच्छतादूतांचे दाहक वास्तव धाडसाने रंगभूमीवर मांडले. कलावंतांचा अभिनय, नेपथ्य, प्रकाश व्यवस्था, रंगभूषा, वेशभूषा या घटकांनी ‘गटार’च्या दृश्यरूपाला सजीव करीत वास्तवाच्या अगदी जवळ नेले. विहीर किंवा गटारातील विषारी वायुमुळे दरवर्षी शेकडो लोक प्राण गमावतात. नाटकातही हे सत्य मांडण्यात आले आहे. प्रमुख पात्र असलेल्या रविच्या वडिलांसह दोघेजण गटार साफ करण्याच्या प्रयत्नात उतरतात आणि एक एक करीत मृत्यू पावतात. रवी आणि त्याची आई मदतीसाठी याचना करतात. पण रस्त्यावरून कर्णकर्कश हॉर्न देत धावणाऱ्या संवेदनहीन मोटरगाड्यांना मायलेकाचा आर्त विलाप ऐकायला जात नाही. मग रवीच परिवर्तनासाठी व्यवस्थेविरोधात विद्रोहाची मूठ आवळतो. हा मृत्यू दर्शविणारे शेवटचे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा करते.अशा अनेक संवेदनशील दृश्य व संवादाने भरले असलेल्या गटारचा २५ वा प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सायंटिफिक सभागृहात गर्दी केली होती. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. शांतिरक्षित गावंडे, डॉ. सुनील अतकर, अर्चना ललित खोब्रागडे, सुरेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते. विविध स्पर्धांमध्ये या नाटकाला शेकडो पुरस्कार मिळाले असून प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे. २५ प्रयोगानंतर नाटकातील कलावंत व इतर सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. श्रेयश अतकर, अस्मिता पाटील, अजय वासनिक, जुहील उके, सांची तेलंग, रिशील ढोबळे, करुणा नाईक, आशिष दुर्गे आदींना गौरविण्यात आले.

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी