शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

ग्वालबन्सीच्या साथीदाराला जामीन

By admin | Published: June 11, 2017 2:52 AM

गोरेवाडा येथील ख्वाजा गरीब नवाज सोसायटीतील भूखंड हडपून मालकाला स्वत:च्या भूखंडाच्या ठिकाणी येण्यास मज्जाव करून जातीवाचक शिवीगाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोरेवाडा येथील ख्वाजा गरीब नवाज सोसायटीतील भूखंड हडपून मालकाला स्वत:च्या भूखंडाच्या ठिकाणी येण्यास मज्जाव करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याच्या साथीदाराला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. दयाशंकर जनार्दन पांडे (४४) रा. डहाके ले-आऊट गोधनी, असे आरोपीचे नाव आहे. गोधनी रोड सुमितनगर येथील रहिवासी मनोहर महादेवराव देऊळकर (६०) यांचा तक्रारीवरून मानकापूर पोलीस ठाण्यात दिलीप ग्वालबन्सी, दयाशंकर पांडे, त्याची पत्नी निर्मला पांडे आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध भादंविच्या ३४१, ३५२, ५०४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(जी)(आर)(एस), ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने दयाशंकर पांडे आणि त्याची पत्नी निर्मला पांडे (४०) यांना अटक केली होती. त्यापैकी न्यायालयाने निर्मला पांडे यांना सशर्त जामीन मंजूर केला होता तर दयाशंकर पांडेला ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. गुरुवारी त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपीच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने दयाशंकर पांडे याला २५ हजाराच्या जामिनावर सोडले. न्यायालयात आरोपीच्यावतीने अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.