लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हैदराबाद येथून प्रवासाहून आलेल्या एका तरुणाने स्वत:हून क्वारंटाईन होण्यासाठी सकाळी ७ वाजता प्रतापनगर पोलीस चौकी गाठली. मात्र ९ वाजेपर्यंत चौकीत कुणी पोलीसच नव्हते. एका सामाजिक कार्यकर्त्याने संपर्क यंत्रणा हलवून त्याला मदत मिळवून दिली. मात्र स्थानिक नगरसेवकांनीही बघतो... पाहतो.. म्हणण्यापुढे काहीच केले नाही. कोरोनासारख्या संक्रमणाच्या दिवसात दिसलेली ही उदासीनता आणि समन्वयाचा अभाव या निमित्ताने प्रकाशात आला आहे.२२ वर्षाचा एक तरुण हैदराबाद येथे आयटी सेक्टरमध्ये काम करतो. बुधवारी सकाळी ७ वाजता तो प्रवासातून नागपुरात पोहचला. आपल्यामुळे कुटुंब आणि शेजारी अडचणीत येऊ नये यासाठी त्याने स्वत:हून क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. त्याने प्रतापनगर पोलीस चौकी गाठली. मात्र नेहमीप्रमाणे येथे कुणीही पोलीस कर्मचारी नव्हते. त्याने स्थानिक नागरिकांकडे चौकशी केल्यावर बबलू गोगायन यांना त्याची अडचण लक्षात आली. त्यांनी एका स्थानिक पत्रकाराशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने पोलीस चौकी गाठली. मात्र तिथे कुणीच पोलीस नव्हते. त्यांनी कंट्रोल रूमला संपर्क केला. तिथूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी थेट पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांंच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर काही वेळातच पोलिसांची संपर्क यंत्रणा हलली. पोलीस निरीक्षक खंडारे व पोलीस उपनिरीक्षक ठाकूर यांचा फोन आला. त्यांनी परिस्थिती समजून घेतली व वाहन पाठविण्याचे आश्वासन दिले. या सर्व भानगडीत संबंधित युवकाला तीन तास प्रतीक्षा करावी लागली.चौकी असते वाऱ्यावरस्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रतापनगर पोलीस चौकी असली तरी रात्री मात्र ती वाºयावर असते. कुणीही पोलीस कर्मचारी येथे नसतात. कोरोनामुळे ड्यूटी लागल्याने अलीकडे तिथे रात्रभर बंदोबस्तावरील जवान असतात. एरवी मात्र ही चौकी रात्री वाºयावरच असते.
‘क्वारंटाईन’साठी करावी लागली तीन तास प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 8:11 PM