शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

हल्दीरामची बनावट वेबसाइट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:09 AM

- कळमन्यात गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हल्दीराम कंपनीची बनावट वेबसाइट तयार करून सायबर गुन्हेगाराने कंपनीची बदनामी ...

- कळमन्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हल्दीराम कंपनीची बनावट वेबसाइट तयार करून सायबर गुन्हेगाराने कंपनीची बदनामी करण्यासोबतच ग्राहकांचीही फसवणूक केली. सप्टेंबर २०२० ते ७ मे २०२१ पर्यंत हा प्रकार सुरू होता.

हल्दीराम फूड इंटरनॅशनल लिमिटेडचे संचालक श्रीनिवास राव (रा. सदाशिवनगर) यांनी कळमना पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार नोंदविली. त्यानुसार अज्ञात आरोपीने सप्टेंबर २०२० मध्ये हल्दीरामची बनावट वेबसाइट तयार केली. त्यावर एक संपर्क क्रमांक देऊन कंपनीच्या नावे त्याने आर्थिक व्यवहार करून ग्राहकांची फसवणूक केली. त्यानंतर आरोपीने फेसबुकवर कंपनीची खोटी जाहिरातही प्रसारित केली. त्यामुळे कंपनीची बदनामी झाली. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर शुक्रवारी कंपनीतर्फे संचालक श्रीनिवास राव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---

यापूर्वीही घडल्या घटना

गेल्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान अशाच प्रकारे सायबर गुन्हेगारांनी फूड कंपनी आणि घरपोच पार्सल सुविधा देणाऱ्या भोजनालयाच्या नावे बनावट वेबसाइट तयार करून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना उघड झाल्या होत्या.

----