लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अत्यावश्यक देखभाल दुरुस्ती, मेट्रो रेल्वे तसेच पायाभूत आराखडा योजनेत उभारण्यात आलेल्या वीज वाहिन्यांवर रोहित्र लावण्यासाठी महावितरणकडून २९ आॅगस्ट रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते १० या काळात चुनाभट्टी, मध्यवर्ती कारागृह परिसर, अजनी चौक, माऊंट कारमेल शाळा, प्रशांतनगर, समर्थनगर, भगवाघर ले-आऊट, काचीपुरा, रामदासपेठ, महाजन मार्केट परिसर, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत राहटे कॉलनी, न्याय सहायक प्रयोग शाळा, धंतोली, काँग्रेसनगर, रामदासपेठ कॅनॉल रोड, नवजीवन कॉलनी, प्रगती कॉलनी, गजानननगर, उरुवेला कॉलनी, छत्रपतीनगर, सहकारनगर, राजीव नगर, रामनगर, हिल टॉप, मुंजेबाबा आश्रम, वर्मा ले-आऊट, सुदाम नगरी, पांढराबोडी, संजयनगर, सुभाषनगर, तुकडोजीनगर, कामगार कॉलनी, नाईक ले-आऊट, शास्त्री ले-आऊट, जयताळा, त्रिमूर्तीनगर, नेल्को सोसायटी, दीनदयालनगर, जीवनछाया सोसायटी, त्रिमूर्तीनगर बगीचा, भामटी, सुजाता ले-आऊट, जयहिंदनगर, कापसे ले आऊट, स्वावलंबीनगर, इंद्रप्रस्थनगर, टेलिकॉमनगर, संचयनी प्रेस्टिज, रवींद्रनगर, बंडू सोनी ले-आऊट, कॉसमॉस टाऊन, चिंचभवन, वैशालीनगर, राजारामनगर, कचोरे पाटीलनगर, नरसाळा या भागातील वीज पुरवठा बंद राहील.सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत तेलंगखेडी, अमरावती मार्ग, मरारटोली, या भागातील वीज बंद राहील. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत माटे चौक, धरमपेठ, आठ रास्ता चौक, लक्ष्मीनगर, भांडे ले-आऊट, पन्नास ले-आऊट, तपोवन, सोनेगाव, सहकार नगर,जयप्रकाशनगर, नरकेसरी ले-आऊट, कन्नमवारनगर, कर्वेनगर, शिवणगाव, भोसले नगर, बिट्टूनगर, अग्ने ले-आऊट, सावरकर नगर, खामला येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत अत्रे ले-आऊट, सुरेंद्रनगर, तात्या टोपे नगर, सकाळी ९ ते ११ या वेळेत गोपालनगर, दुर्गा मंदिर, माटे चौक सकाळी ८ ते दुपारी १२ वेळेत सोनबानगर, लावा, खडगाव सकाळी ८ ते दुपारी २ या काळात दु्रगधामना, सुराबर्डी, वडधामना, तेजस्वीनगर, कृष्णा नगरी येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी.
अर्ध्या नागपुरात बुधवारी वीज पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:25 PM
अत्यावश्यक देखभाल दुरुस्ती, मेट्रो रेल्वे तसेच पायाभूत आराखडा योजनेत उभारण्यात आलेल्या वीज वाहिन्यांवर रोहित्र लावण्यासाठी महावितरणकडून २९ आॅगस्ट रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
ठळक मुद्देदेखभाल-दुरुस्तीचे कामदक्षिण-पश्चिम नागपुरातील वस्त्यांचा समावेश