शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

खतांची दीडपट दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:08 AM

नागपूर : खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीची कामे सुरू केली आहेत. मात्र रासायनिक खतांच्या भरमसाट दरवाढीचे नवे ...

नागपूर : खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीची कामे सुरू केली आहेत. मात्र रासायनिक खतांच्या भरमसाट दरवाढीचे नवे संकट शेतकऱ्यांच्या बोकांडी बसले आहे. खत उत्पादक कंपन्यांनी तब्बल दीडपटीने खतांच्या किमती वाढविल्या आहेत. काही ग्रेडच्या बॅगमागे ७०० ते ९०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी शेतमालाचा उत्पादन खर्च दुप्पट होणार आहे.

खरे तर फेब्रुवारी, मार्चपासूनच खतांच्या दरवाढीबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. ७ एप्रिलला ‘इफ‌्को’ने संयुक्त खतांचे नवीन दरपत्रक जाहीर केले. यात ही दरवाढ सुचविण्यात आली होती. त्यामुळे गदारोळ झाल्याने ही दरवाढ होणार नाही, अशी माहिती इफ‌्कोचे महाव्यवस्थापक डॉ. यू. एस. अवस्थी यांनी ८ एप्रिल रोजी दिली. त्याच काळात राज्यांच्या निवडणुकांमुळे केंद्र सरकारनेही सारवासारव करीत रासायनिक खतांची दरवाढ होणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र दरवाढ न करण्याबाबत कोणतेही परिपत्रक काढले नाही. यादरम्यान पाच राज्यांच्या निवडणुका, कोरोनाचे संकट, टाळेबंदी आणि हंगाम नसल्याने कुणाचेही याकडे लक्ष गेले नाही. आता खत उत्पादक कंपन्यांनी नव्या दरपत्रकासह खते बाजारात आणली आहेत. ही दरवाढ दीडपटीपेक्षा जास्त असल्याने संयुक्त खतांच्या किमती ७०० ते ९०० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. युरियानंतर सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या डीएपी खताच्या किमतीतही माेठी वाढ झाली आहे. ही दरवाढ भरमसाट असल्याने फसवणूक झाल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने दरवाढ

याबाबत खत उत्पादक कंपन्यांचे वेगळे स्पष्टीकरण आहे. खतांची दरवाढ दुकानदारांनी केल्याचा संभ्रम निर्माण केला जात आहे. खरे तर संयुक्त खतांचे दर ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला नसतो; तर उत्पादक कंपन्यांना असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्याने खतांची दरवाढ अपरिहार्य असल्याचे कंपन्यांकडून सांगितले जात आहे.

- खतांचे दर वाढलेले आहेत. ते कमी करण्यासाठी केंद्र सरकारने खत उत्पादक कंपन्यांना अनुदान वाढवून द्यायला पाहिजे. ही दरवाढ कमी करून शासनाने कोरोनाकाळात शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- विनोद तराळ, अध्यक्ष, माफदा

सबसिडीतही घट

खतांची सबसिडी ही त्यातील घटकांवर (न्यूट्रिएंट बेस्ड) अवलंबून आहे. नत्राची सबसिडी प्रतिकिलो १८.९०१ वरून १८.७८९ रुपये करण्यात आली आहे. याशिवाय स्फुरद १५.२१६ वरून १४.८८८ रुपये, पालाश ११.१२४ वरून १०.११६ रुपये, गंधक ३.५६२ वरून २.३७४ रुपये प्रतिकिलो करण्यात आली आहे. याचाही परिणाम खत दरवाढीवर होत आहे.

कृषी विभागही संभ्रमात

दरम्यान, खतांच्या दरवाढीवरून शेतकऱ्यांकडून संतप्त भावना व्यक्त हाेत असताना कृषी विभाग मात्र संभ्रमावस्थेत आहे. सबसिडी आणि दरवाढीबाबत बाेलण्यास अधिकारी तयार नाहीत. केवळ खतांच्या बॅगवरील प्रिंटेड किमतीनुसार खते घ्यावी व कुणी अधिकचे घेत असल्यास तक्रार करावी, असे माफक आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

असे आहेत नवे दर

खताचा प्रकार जुने दर नवे दर

इफ‌्काे

डीएपी ११८५ १९००

१०:२६:२६ ११७५ १७७५

१२:३२:१६ ११९० १८००

२०:२०:० ९७५ १३७५

आयपीएल

पाेटॅश ८५० १०००

डीएपी १२०० १९००

महाधन

१०:२६:२६ १२७५ १९२५

२४:२४:० १३५० १९००

२०:२०:१३ १०५० १६००

जीएसएफसी

१०:२६:२६ ११७५ १७७५

१२:३२:१६ ११९० १८००

डीएपी १२०० १९००

सुपर फास्फेट ३७० ४७०