लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता कर अर्धा माफ करावा,तसेच थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करावा, अशी मागणी नोटीसद्वारे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली आहे.सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावा. तसेच मालमत्ता कर व दंड माफ करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका जाधव यांनी मांडली आहे.संघर्ष नगर चौक ते भांडेवाडी डम्पिंग यार्ड यादरम्यानच्या रस्त्यासाठी ७.२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तसेच अर्थसंकल्पात यासाठी एक कोटीची तरतूद केली होती. मात्र अद्याप या कामाचे कार्यादेश जारी करण्यात आलेले नाही. याबाबतची नोटीस विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.गौण खनिजावरील शुल्क शासनजमा केले का?महापालिकेमध्ये विविध कंत्राटदार बांधकामाशी निगडित कंत्राट घेत असताना या देयकाचे भुगतान करताना गौण खनिज शुल्क वसूल केले जाते. नियमाप्रमाणे ही रक्कम शासनजमा करावी लागते. ही रक्कम शासनजमा करण्यात आली किंवा कसे याबाबत परिपत्रक काढून विभागाला तशा सूचना दिल्या आहेत का, अशा आशयाची नोटीस प्रवीण दटके यांनी दिली आहे.
अर्धा टॅक्स माफ करा : सभागृहात जाधव यांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 12:45 AM
कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता कर अर्धा माफ करावा,तसेच थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करावा, अशी मागणी नोटीसद्वारे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली आहे.
ठळक मुद्देथकीत करावरील दंड माफ करण्याची सूचना