लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे व राष्ट्रवादीचे हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे यांच्यात झालेल्या हमरीतूमरीची चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली आहे. हा प्रकार चक्क सीईओंपुढे त्यांच्या कक्षात झाला. आमदार अंगावर धावून आल्याचा आरोप प्रकाश नागपुरे यांनी केला आहे.हिंगणा विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश नागपुरे, जि.प.चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, नागपूर पं.स.चे उपसभापती संजय चिकटे व राष्ट्रवादीचे सचिव विष्णू माथनकर हे पाणी पुरवठ्याच्या कामासंबंधी सीईओंकडे गेले होते. सीईओंसोबत चर्चा सुरू असताना आमदार मेघेही तेथे आले. त्यांनी आरोग्य उपकेंद्राचे काम थांबविण्यात आल्यावरून बोलायला सुरुवात केली. ते आवेशात बोलत असल्यामुळे नागपुरे यांच्यासोबत असलेल्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण आमदार उठून त्यांच्या अंगावर आल्याचा आरोप नागपुरे यांनी केला. नागपुरे यांनी समजविण्याचा प्रयत्न केला, पण आमदार चांगलेच संतापले होते. यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी केल्यामुळे सीईओंच्या कक्षातील वाद निवळला. हा वाद आरोग्य उपकेंद्रावरून झाला. २०१८-१९ मध्ये बोरखेडी फाटक येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले होते. त्याचे भूमिपूजन आमदार मेघे यांनी स्वत: केले होते. मात्र नंतर आमदारांनी या केंद्राचे बांधकाम त्यांच्या सूतगिरणीच्या परिसरात करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात तक्रारी झाल्याने जि.प. प्रशासनाने चौकशी करून बांधकाम थांबविले, असल्याचे नागपुरे म्हणाले. आज दोघेही सीईओंच्या कक्षात समोरासमोर आल्याने आमदाराचा भडका उडाला.आमदाराला क्रेडिट मिळू नये म्हणून विरोधज्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र बनत होते ती जागा न्यायालयीन प्रकरणात अडकली आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी दुसरी कुठलीही जागा मिळत नसल्यामुळे माजी जि.प. सदस्य माझ्याकडे आले होते. आरोग्य उपकेंद्राचा पैसा परत जाऊ नये म्हणून मी माझी जागा आरोग्य केंद्रासाठी दिली. तिथे उपकेंद्राचे कामही सुरु झाले होते. पण प्रकाश नागपुरे यांनी लोकप्रतिनिधी नसतानाही आक्षेप घेतला व आरोग्य केंद्राचे काम बंद पाडले. गुरुवारी ते सीईओंच्या कक्षात होते म्हणून हा विषय काढला. तेव्हा त्यांनीही अरेतुरेची भाषा वापरली. त्यामुळे हमरीतूमरी झाली.समीर मेघे, आमदार, हिंगणा विधानसभा
आमदार व राष्ट्रवादीच्या हिंगणा विधानसभा अध्यक्षाची हमरीतुमरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 9:49 PM
हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे व राष्ट्रवादीचे हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे यांच्यात झालेल्या हमरीतूमरीची चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली आहे. हा प्रकार चक्क सीईओंपुढे त्यांच्या कक्षात झाला. आमदार अंगावर धावून आल्याचा आरोप प्रकाश नागपुरे यांनी केला आहे.
ठळक मुद्देसीईओंच्या कक्षातील घटना : आरोग्य उपकेंद्रावरून झाला वाद