शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हरीश, स्वातीने जिंकली नागपूर महामॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 5:35 AM

पाचव्या पर्वाला नादखुळा प्रतिसाद: शादाब पठाण, पौर्णिमा पठाडे दहा किमी शर्यतीचे विजेते

नागपूर : ढोलताशांचा दणदणाट, विविधरंगी आतषबाजीने संचारलेला उत्साह आणि गीतसंगीताने नवचैतन्य निर्माण करणाऱ्या वातावरणात लोकमत प्लास्टो नागपूर महामॅरेथॉन’ मध्ये सहभागी झालेल्या धावपटूंनी शहर पुन्हा ‘बॅक ऑन ट्रॅक’ आल्याचे दाखवून दिले. रविवारी पहाटे मंद गारव्याची झुळूक अंगावर घेत धावपटूंमध्ये अमाप ऊर्जा संचारली आणि भव्यदिव्य आयोजनाचा लौकिक असलेल्या स्पर्धेचा अनुभव दोन वर्षांच्या विरामानंतर पुन्हा नागपूरकरांना आला. 

महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील धावपटूंची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये अपूर्व उत्साह संचारला होता. वॉर्मअप सेशन आणि वाद्याच्या तालावर  चैतन्याला बहर आला होता. पहाटे ५.४५ वाजता २१ किमी अंतराच्या स्पर्धेला सुरुवात झाली. नागपूरकर धावपटू आणि विदर्भाबाहेरील धावपटूंमध्ये चुरस होती. स्पर्धेच्या अखेरच्या चरणात  हरीश शेरोन याने ०१:१०:१९ वेळेची नाेंद करीत प्रथम क्रमांक पटकाविला, अनुराग कोनकर याने ०१:११:५४ वेळेत अंतर पूर्ण करीत दुसरा क्रमांक मिळविला. सन्नी फुसाटे   ०१:१३:२६ वेळेची नोंद करीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.२१ किमी महिला गटात स्वाती पंचबुधे  हिने अपेक्षेप्रमाणेच प्रथम क्रमांक पटकावित नागपूरकडे पदक राखण्यात यश मिळविले. तिने ०१:२०:०९ इतक्या वेळेची नाेंद केली. पूजा पंचबुधे हिने ०१:३१:४७  वेळ घेत द्वितीय, तर निधी गवाळे हिने ०१:३३:५८ वेळेची नोंद करीत तिसरा क्रमांक मिळविला.२१ किमी डिफेन्स पुरुष गटातून अंबुज तिवारी, रवी कुमार आणि अविनाश पटेल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. महिला गटात नागपूरची यामिनी ठाकरे विजेती ठरली, तर रोशनी भुरे हिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शबिहा रिझवी हिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.विविध गटातील शर्यतींना पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत, जिल्हाधिकारी विमला आर., लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, सीबीआयचे अधीक्षक एम. एस. खान, आर. सी. प्लास्टो टॅंक ॲन्ड पाइपचे संचालक विशाल अग्रवाल, वैभव प्लास्टो पॅकेजिंग लि. चे संचालक वैभव अग्रवाल, गोयल गंगा ग्रुपचे कार्यकारी संचालक अनुप खंडेलवाल, किंग्सवे हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रकाश खेतान, सीईओ डॉ. आशिष चंद्रा, कोटक महिंद्रा बॅंकेचे एरिया व्यवस्थापक  संतोष वळसे, मॉईलचे फायनान्स संचालक राकेश तुमाने, ट्रिट आइस्क्रिमचे संचालक अमोल चकनलवार, मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतनचे संचालक मधुसूदन मुडे आणि शीला मुडे, निर्मिक ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष जया अंभोरे, लोकमतचे संपादक श्रीमंत माने, लोकमत टाइम्सचे संपादक एन. के. नायक, यांनी ‘फ्लॅग ऑफ’ केला आणि स्पर्धकांनी आपल्या ध्येयाकडे वेगाने धाव घेतली.पुरस्कार वितरण सोहळा प्लास्टो पाइप ॲन्ड टॅंकचे संचालक नीलेश अग्रवाल, ऑक्सिरिचचे प्लांट ओनर पीयूष पवार, किंग्सवे हॉस्पिटल्सचे मुख्य फायनान्स अधिकारी नीलेश मुंदडा, संचालक डॉ. राजन बारोकर, आ. विकास ठाकरे, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, अमोल चकनलवार, मधुसूदन मुडे, जया अंभोरे, ऑरेंजसिटी रनर्सच्या अपर्णा प्रभुदेसाई,  ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष नीलेशसिंग, सीनिअर जी. एम. (कॉर्पोरेट) आशिष जैन, जी.एम. (कॉर्पोरेट) आसमान सेठ, रेस डायरेक्टर संजय पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व गटातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पुरस्कार, प्रमाणपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आले.२१ किमी व्हेटरन्स पुरुष गटात भास्कर कांबळे, ई. जे. जोस आणि घनशाम पदमगीरवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला, तर महिला गटातून डाॅ. इंदू टंडन प्रथम,  शोभा यादव द्वितीय, तर विद्या धापोडकर या तिसऱ्या स्थानी राहिल्या.

१० किमी खुला गट पुरुष गटात  शादाब पठाण याने  ३१ मिनिटे ४८ सेकंद वेळेची नोंद करीत प्रथम क्रमांकाने स्पर्धा पूर्ण केली. सुमित गोराईने ३२:०८ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करीत दुसरा क्रमांक मिळविला. मोहित शर्माने ३२:३६ मिनिटांत स्पर्धा पूर्ण केल्याने त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

महिला गटात अव्वल पौर्णिमा पठाडे हिने  ३९:१८ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करीत पहिला क्रमांक पटकाविला, तर वैष्णवी आयेवार (४०:००) आणि स्वराली ठाकरे (४०:१७) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक   मिळविला. १० किमी व्हेटरन्स (पुरुष) गटात समीरकुमार कोलया (३९:४५), रमेश चिविलकर (४१:३७),  पोपिंदर सिंग (४३:३६), तर महिला गटात प्रतिभा नाडकर (५०:३९), शारदा भोयर (५९;२९), राधिका मुजुमदार( १:०१:३२) यांनीही आपल्या गटात विजेतेपद मिळविले. या स्पर्धेला नागपूर शहरासह अन्य ठिकाणांहूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.

n २१ किलोमीटर (खुला गट - पुरुष) १. हरीश शेरोन १ तास १० मिनिटे १९ सेकंद, २. अनुराग कोनकर १ तास ११ मिनिटे ५४ सेकंद, सन्नी अर्जुन फुसाटे १ तास १३ मिनिटे २६ सेकंद.n २१ किलोमीटर (खुला गट-महिला) १. स्वाती मधुकर पंचबुधे १ तास २९ मिनिटे ०९ सेंकद, २. पूजा मधुकर पंचबुधे १ तास ३१ मिनिटे ४७ सेकंद, निधी राम गवाळे १ तास ३३ मिनिटे ५८ सेकंद.n १० किलोमीटर (खुला गट-पुरुष) १. शादाब अय्युब पठाण ३१ मिनिटे ४८ सेकंद, २. सुमित गोराई ३२ मिनिटे ०८ सेकंद, ३. मोहित शर्मा ३२ मिनिटे ३६ सेकंद. 

विविध गटातील विजेते

n १० किलोमीटर (खुला गट-महिला) १. पौर्णिमा गणेश पठाडे ३९ मिनिटे १८ सेकंद, २. वैष्णवी आयेवार ४० मिनिटे, ३. स्वराली श्रीकांत ठाकरे ४० मिनिटे १७ सेकंद.n २१ किलोमीटर (प्रौढ गट-पुरुष) १. भास्कर मधुकर कांबळे १ तास २२ मिनिटे २७ सेकंद, जोस १ तास २६ मिनिटे ०७ सेकंद, घनश्याम पांडुरंग पदमगीरवार १ तास २८ मिनिटे ४७ सेकंद.n २१ किलोमीटर (प्रौढ गट-महिला) १. डॉ. इंदू टंडन १ तास ५० मिनिटे ४८ सेकंद, २. शोभा यादव १ तास ५८ मिनिटे ११ सेकंद, ३. विद्या गिरीधारी धापोडकर १ तास ५८ मिनिटे १२ सेकंद.n १० किलोमीटर (प्रौढ गट - पुरुष) १. समीर कुमार कोलया ३९ मिनिटे ४५ सेकंद, २. रमेश चिवीलकर ४१ मिनिटे ३७ सेकंद, पोपिंदर सिंग ४३ मिनिटे ३६ सेकंद. n १० किलोमीटर (प्रौढ गट -महिला) १. प्रतिभा नाडकर ५० मिनिटे ३९ सेकंद, २. शारदा भोयर ५९ मिनिटे २९ सेकंद, राधिका मुजुमदार १ तास ०१ मिनिटे ३२ सेकंद.

 

 पुढील मॅरेथॉन पुण्यात महामॅरेथॉन  आता पुणे शहरात १० एप्रिलला रंगणार आहे. नागपूरकरांनी या स्पर्धेस भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तमाम नागपूरकरांचे आभार व्यक्त करते. सहभागी झालेल्या सगळ्यांसाठी आणि आमच्यासाठी रविवारची ही सुंदर सकाळ म्हणजे महागुडमाॅर्निंग आहे. आपल्या सगळ्यांचा हा पाठिंबा आमचा उत्साह अधिक वाढवणारा आहे. हा सपोर्ट ‘लोकमत’सोबत कायम राहू दे...   खूप खूप धन्यवाद.    - रुचिरा दर्डा,  संस्थापिका, लोकमत महामॅरेथॉन

 

टॅग्स :nagpurनागपूरMarathonमॅरेथॉन