शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

तुमचे वीज बिल चेक केले का? जूनमध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 9:15 AM

नवीन दर, फिक्स्ड चार्ज, व्हीलिंग चार्ज, एफएसीचा फटका

कमल शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : जून महिन्यातील भरमसाट वीज बिलांमुळे खळबळ उडाली आहे. बिलात वीस ते तीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. बिल घेऊन लोक महावितरण कार्यालयावर जात आहेत. अधिकारी हतबल आहेत, तर लोकांचा नाइलाज आहे. त्यांना बिल भरावेच लागेल अन्यथा वीज कापली जाईल. महावितरणने पाठवलेल्या बिलात इंधन समायोजन शुल्क आकारले जात आहे. वीज संकटाच्या काळात खरेदी केलेल्या अतिरिक्त विजेपोटी हे शुल्क आकारले जाते. हे शुल्क ग्राहकांच्या बिलात प्रति युनिट आकारण्यात आले आहे. १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी ४० पैसे, १०१ ते ३०० युनिटसाठी ७० पैसे, ३०१ ते ५०० युनिटसाठी ९५ पैसे व त्यापेक्षा जास्त वापरासाठी १.०५ रुपये प्रति युनिट. या शुल्काच्या नावावर प्रति युनिट वसुली करण्यात आली आहे.

श्रेणी बदलताच दर वाढतो- १०० युनिट्सपर्यंत ४.७१ रुपये वीज दर आहे; परंतु १०१ युनिटपासून ते ३०० युनिटपर्यंत प्रत्येक युनिटसाठी १०.२९ रुपये द्यावे लागतात. म्हणजेच श्रेणी बदलल्याबरोबर ५.५८ रुपयांची वाढ. - ३०१ ते ५०० युनिट्सचा दर  १४.५५ रुपये प्रति युनिट आहे. मागील श्रेणीच्या तुलनेत ४.२६ रुपये अधिक आहे. 

शहरांत फिक्स्ड चार्ज वाढले१ एप्रिलपासून शहरी भागातही फिक्स्ड चार्जमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता सिंगल फेज कनेक्शनसाठी हे शुल्क ११६ रुपयांवरून १२८ रुपये करण्यात आले आहे.  तीन फेज कनेक्शनसाठी ३८४ रुपयांऐवजी ४२४ रुपये वसूल केले जात आहे. महापालिका क्षेत्रात १० रुपयांचा अतिरिक्त फिक्स्ड चार्जसुद्धा वसूल केला जात आहे. 

१.१७ रुपये प्रति युनिटचा चार्ज१ एप्रिलपासून नवीन वीज दर लागू झाले. ही वाढ सुमारे पाच टक्के असल्याचा महावितरणचा दावा आहे; परंतु इतर शुल्क जोडल्यास ही वाढ ९.८६ टक्क्यांवरून १०.४२ टक्क्यांपर्यंत पोहोचते. याशिवाय प्रत्येक युनिटवर १.१७ रुपये व्हीलिंग चार्ज आकारला जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज