एकूण बसेस : ४१०
सध्या सुरू असलेल्या बसेस : ६०
एकूण कर्मचारी : २,७५०
वाहक : ८५०
चालक ९५०
सर्वाधिक वाहतूक असलेले मार्ग
- सध्या एसटीच्या नागपूर विभागात सर्वाधिक वाहतूक अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, काटोल, सावनेर, रामटेक या मार्गावर सुरू आहे. अनेक जण नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने नागपूरला येत असल्यामुळे, या मार्गावर प्रवाशांचा एसटीला अधिक प्रतिसाद लाभत आहे.
प्रत्येक बस होते सॅनिटाइझ
- प्रवासाला निघण्यापूर्वी प्रत्येक बस धुण्यात येते. त्यानंतर, सोडियम हायड्रोक्लोराइडने बस निर्जंतुक करण्यात येते, परंतु प्रवासी सीटवर बसण्यापूर्वी सॅनिटायझरने सीट सॅनिटाइझ करीत नसल्याचे दिसून आले आहे, तर अनेक प्रवासी मास्कचाही वापर करीत नसल्याचे चित्र आहे.
दीड महिन्यात २०७ कोटींचा फटका
- मागील दीड महिन्यात एसटीच्या नागपूर विभागाला २०७ कोटींचा फटका बसला आहे. नागपूर विभागाचे उत्पन्न प्रति दिवस ४८ लाख रुपये येते, परंतु मोजक्याच बसेस सुरू असल्यामुळे दिवसाकाठी केवळ २ लाखांचे उत्पन्न मिळत असल्यामुळे एसटीला प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे.
सोमवारपासून वाढणार प्रतिसाद
- सध्या एसटीच्या मोजक्याच बसेस सुरू आहेत. ४८ लाखांपैकी केवळ २ लाखच उत्पन्न एसटीला मिळत आहे, परंतु सोमवारपासून ५० टक्के वाहतूक सुरू होणार असल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली आहे.
बस सुरू झाल्यामुळे वेतनाचा प्रश्न सुटला
‘एसटी बसेसची वाहतूक सुरळीत होत आहे. प्रवाशांचा प्रतिसादही वाढत आहे. त्यामुळे वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. बसेस बंद असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सतत वेतनाची चिंता भेडसावत असते.’
-एक चालक
वाहतुक सुरू झाल्यामुळे जीवात जीव आला
‘एसटीच्या मोजक्यात बसेस सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांना नियमित काम मिळत नव्हते. त्यामुळे वेतनाचा प्रश्न गंभीर झाला होता. आता वाहतूक सुरू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवात जीव आला असून, त्यांना नियमित वेतन मिळणार आहे.’
-एक वाहक
...............