शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

उपराजधानीची ‘हवाई’ वाटचाल वेगात : वर्षभरात प्रवासी संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 10:17 PM

उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून २०१८ मध्ये वर्षभरात नागपुरात उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येने चक्क १३ लाखांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे जवळपास त्याच संख्येत शहरात प्रवासी दाखलदेखील झालेत. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये आगमन झालेल्या व उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येत थोडीथोडकी नव्हे तर ३० टक्क्यांनी वाढ झाली. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देउड्डाण करणाऱ्या प्रवाशांचा टप्पा १३ लाखांच्या पार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून २०१८ मध्ये वर्षभरात नागपुरात उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येने चक्क १३ लाखांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे जवळपास त्याच संख्येत शहरात प्रवासी दाखलदेखील झालेत. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये आगमन झालेल्या व उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येत थोडीथोडकी नव्हे तर ३० टक्क्यांनी वाढ झाली. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘मिहान इंडिया लिमिटेड’कडे विचारणा केली होती. २०१८ मध्ये नागपूर विमानतळावरुन किती प्रवाशांनी प्रवास केला, या कालावधीत किती खासगी हेलिकॉप्टर्स व विमाने उतरली, विमानांच्या दळणवळणातून किती महसूल प्राप्त झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर विमानतळावरुन १३ लाख ३७ हजार ८४० प्रवाशांनी उड्डाण केले. तर १३ लाख ३४ हजार १८० प्रवासी शहरात आले. सरासरी दररोज ३ हजार ६६५ प्रवाशांनी शहरातून उड्डाण भरले. २०१६ मध्ये ९ लाख ३१ हजार ५२३ प्रवाशांनी नागपूर विमानतळावरुन उड्डाण भरले होते.१२०० हून अधिक खासगी विमानांचे ‘लॅन्डिंग’२०१८ मध्ये विमानतळावर १ हजार २४६ खासगी विमाने व हेलिकॉप्टर्स उतरली. यातून ‘मिहान इंडिया लिमिटेड’ला ४४ लाख २३ हजार ८५९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.महसुलातदेखील झाली वाढवर्षभरात विमानांच्या दळणवळणातून ‘मिहान इंडिया लिमिटेड’ला ४४ कोटी ८६ लाख ६० हजार ७३ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. हा महसूल प्रामुख्याने ‘लॅन्डिंग’, ‘पार्किंग’, ‘पीएसएफ’ (पॅसेंजर सर्व्हिस फी) आणि जाहिरातीच्या माध्यमातून मिळाला. विमानांच्या ‘लॅन्डिंग’पासून २५ कोटी ९ लाख २२ हजार ४८४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला तर ‘पीएसएफ’अंतर्गत १७ कोटी ३६ लाख ८२ हजार ७३३ रुपयांचा महसूल मिळाला. २०१७ मध्ये या माध्यमातून मिळालेल्या महसूलाचा आकडा ३५ कोटी ८१ लाख ६७ हजार २४ इतका होता. २०१८ मध्ये महसूलात ९ कोटी ४ लाख ८३ हजार ४९ रुपये म्हणजेच २५ टक्के वाढ झाली. २०१८ मध्ये ‘मिहान इंडिया लिमिटेड’ला एकूण १२० कोटी ४ लाख ११ हजार ५६९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला व यातील ९३ कोटी ७० लाख २४ हजार ३१३ रुपये खर्च झाले.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता