नागपूर : मुंबईच्या आयकर अधिकाऱ्यांची हवाला आणि डब्बा व्यापाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू होती. अकरा जणांची २० हून अधिक कार्यालये आणि निवासस्थानांची सखोल तपासणी केली. रोखीसह कोट्यावधींच्या अवैध आर्थिक व्यवहाराची संशयास्पद कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती आहे. ही कारवाई शुक्रवारीही सुरू राहण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या आयकर अधिकाऱ्यांना टाळलेडब्बा व्यावसायिक रवी अग्रवाल याच्यासोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे मुंबईच्या आयकर अधिकाऱ्यांनी नागपूरच्या अधिकाऱ्यांना कारवाईत सहभागी करून घेण्यास टाळले. त्यामुळे नागपूरच्या आयकर अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरच्या अनेक आयकर अधिकाऱ्यांनी त्याच्या छत्तरपूर फॉर्मचा अर्थपूर्ण दौरा केल्याची माहिती आहे. काही अधिकाऱ्यांची नावे कारवाईदरम्यान उजेडात आली असून त्यांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांचे मत आहे.
यांच्यावर झाली कारवाईरवी अग्रवाल, शैलेश लखोटिया, पारस जैन, लाला जैन, करण थावरानी, प्यारे खान, गोपी मालू, अक्षद लुणावत, हेमंत तन्ना, इजराईल सेठ आणि सीए रवी वानखेडे अशा अकरा जणांवर छापेमार कारवाई झाली आहे.
कोलकात्यात नॉन बँकिंग फायनान्स कंपनीरवी अग्रवालची कोलकात्यात नॉन फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) आहे. या ह्यशेलह्ण कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. रवी नागपुरात बसून लोकांना ३ ते ४ टक्के दराने फायनान्स करीत होता. या माध्यमातून त्याच्या जाळ्यात अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आल्याचा संशय आयकर अधिकाऱ्यांना आहे. त्याच्या एफबीएफसीचा पत्ता मुंबई आहे, तर त्याने कंपनीची कामे कोलकाता येथून होत असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय त्याच्या एल७ कंपनीचा अवैध आर्थिक व्यवहारात मोठा वाटा आहे. या कंपनीच्या माध्यमातून तो डब्बा व्यवसाय चालवित होता.
अनेक बिल्डर रवीच्या जाळ्यातरवी अग्रवालच्या जाळ्यात नागपुरातील काही बिल्डरही अडकले आहेत. त्यांनी रवीकडून कोट्यवधीं उचल केली आहे. या व्यवहाराची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय रवी अग्रवालच्या छत्तरपूर फॉर्ममध्ये अनेक करोडपती, मोठे अधिकारी, बुकी आणि काही व्यापाऱ्यांनी व्हिला खरेदी केले आहेत. त्यांचीही नावे अधिकाऱ्यांच्या रडावर आली आहेत.
प्यारे खानची होणार व्यापक चौकशीकधी काळी ऑटो चालवून कुटुंबाचे पालनपोषण करणारा प्यारे खान कमी कालावधीत कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक बनला आहे. ही संपत्ती त्याने कुठून व कशी मिळविली, याचा शोध अधिकारी घेत आहेत. ताजाबाद ट्रस्टचा अध्यक्ष असून आता आयकरच्या जाळ्यात अडकला आहे.